Home भद्रावती लक्षवेधी :- काय हो अहिर साहेब, कर्नाटका एम्टा कोळसा खानीची परवानगी रद्द...

लक्षवेधी :- काय हो अहिर साहेब, कर्नाटका एम्टा कोळसा खानीची परवानगी रद्द कशासाठी?

1414
0

 

एवढाच शेतकऱ्यांचा कळवळा असेल ना? तर मग दिल्लीत शेतकरी आंदोलनाचे नेत्रूत्व करा.

लक्षवेधी:-

प्रकलपग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपला KPCL विरोधात लढा सुरूच राहील असा इशारा माजी खासदार हंसराज अहिर यांनी दिल्यानंतर जनसामान्यांमधे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, कारण सत्तेत असतांना कुणालाही न्याय मिळवून देण्यास त्यांनी पुढाकार घेतला नाही. आपल्या कार्यकाळात नवीन ऊद्दोग आणला नाही आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात जीन्स पैंट घालून आलेल्या आंदोलनकर्त्याचे आंदोलन शेतकऱ्यांचे आंदोलन नसल्याची ज्यांनी बोंब मारली ते हंसराज अहिर हे कसले आंदोलन करणार? असा खोचक प्रश्न जनतेतून विचारले जात आहे.

भद्रावती तालुक्यात असलेल्या कर्नाटका एम्टा ही कोळसा खान मागील सन २००६ पासून सुरू होती व त्या कंपनीत परिसरातील हजारो लोकांना रोजगार मिळाला पण कालांतराने या कंपनीत राजकारण शिरले आणि नेत्यांना इथे कोळसा चोरी पासून तर ठेकेदारी पर्यंत सर्व कामे मिळाली आणि ज्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर आंदोलने करून नेत्यांनी कंपनीवर आपला धाक जमवला ते नेते कोट्याधीश झाले आणि कार्यकर्त्या वर पोलीस केसेस लागून ते देशोधडीला लागले. त्यापैकी काहींनी आपली बाजू सांभाळली खरी पण अजूनही त्या पोलीस केसेस त्यांच्या मानगुटीवर बसल्या आहेत.असे असले तरी भद्रावती परिसरातील हजारो लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या कंपनीच्या माध्यमातून रोजगार मिळाला व या परिसरातील आर्थिक उलाढाल वाढली. दरम्यान तत्कालीन खासदार हंसराज अहिर यांच्याकडे कोल इंडिया चा सभासद म्हणून अनेक वर्ष जबाबदारी होती शिवाय मागील लोकसभेत ते देशाचे राज्यमंत्री पण होते दरम्यानच्या काळात बरांज गावातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आपल्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर आंदोलने केली अनेक दिवस उपोषण चालले पण तत्कालीन आमदार खासदार यांनी त्यांच्या या मागणी कडे ढुंकून ही बघितले नाही आणि शेवटी हंसराज अहिर मंत्री असतांनाच्या त्यांच्या काळातच कर्नाटका एम्टा ही कोळसा खान बंद पडली. पण त्यावेळी ही कोळसा खान बंद पडू नये म्हणून हंसराज अहिर यांनी कुठलेही प्रयत्न केले नाही.

कर्नाटका एम्टा ही कोळसा खान बंद पडल्यानंतर हंसराज अहिर नेमके काय करीत होते हे अजूनही कळले नाही कारण तेव्हां भाजप चे सरकार केंद्रात आणि राज्यात पण होते आणि या कोळसा खाणीत जवळपास ४ लाख टन कोळसा स्टॉक होता तो चोरीला गेला होता या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकशी झाली पण कोट्यावधी रुपयाचा कोळसा जळून खाक झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आणि हे प्रकरण संपविण्यात आल त्यावेळी हंसराज अहिर यांनी का आवाज उठवला नाही कारण त्यांनी मनावर घेतल असत तर केंद्रात त्यांच सरकार असल्याने ते सीबीआई चौकशी लाऊ शकले असते पण त्यांनी ते केल नाही. यामागे काय गुपित आहे हे त्यांनाच माहीत पण कोळसा तस्करांनी हजारो कोटीचा कोळसा या खानीतुन चोरला आणि त्याची विल्हेवाट लावली आणि चोर चोर मौसेरे भाऊ म्हणून या हजारो कोटी कोळसा चोरीच्या प्रकरणाला दाबण्यात आले ही वस्तुस्थिती आहे.

आता कर्नाटका एम्टा चे नामकरण PCL असे होऊन या कंपनीला कोळसा उत्पादन करण्याची परवानगी रद्द प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या परिसरातील हजारो बेरोजगार यूवकांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत आणि येथील कोळसा वाहतूक कंत्राटदार व कामगार यांच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे अर्थातच कंपनी सुरू झाल्याने जुन्या कामगार मजूर व कर्मचारी यांना नौकरी मिळाल्याने त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे असे असतांना दुसरीकडे मात्र आपली राजकीय दुकानदारी थाटन्यासाठी माजी खासदार श्हंसराज अहीर यांचे नेतृत्वात मानोरा व चेक बरांज या प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन करा. पुनर्वसन मोबदला यासह प्रकल्पग्रस्तांना देय मोबदला द्या. कामगारांचे थकीत वेतन, नोकरी व नोकरी ऐवजी अनुदान आदी मागण्या मान्य करा अन्यथा जिल्हा प्रशासनाने बरांज स्थित कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. च्या कोळसा खाणीस उत्खननाची परवानगी दिली असल्याने ही परवानगी त्वरीत रद्द करा या मागणीसाठी दि. 26 मार्च 2021 रोजी सकाळी 08.00 वा. माजी खासदार हंसराज अहीर प्रकल्पग्रस्त व जनप्रतिनिधी सोबत भद्रावती तालुक्यातील बरांज मानोरा फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायदळ आंदोलन करण्यात आले.

खरं तर हंसराज अहिर यांना समजायला हवे की एकीकडे नरेंद्र मोदी सरकारने देशातील युवा बेरोजगारांना प्रत्त्येक वर्षाला दोन कोटी नौकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले नाही उलट सहा वर्षात देशातील १० कोटी पेक्षा जास्त लोकांच्या नौकऱ्या गेल्या महागाई उच्च स्तरावर आहे आणि शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाले असल्याने ते चिंतेत आहे शिवाय केंद्राने तीन जाचक कृषि कायदे संमत करून शेतकऱ्यांना गुलाम बनविल्या गेले असल्याने दिल्लीत मागील १०० दिवसांपेक्षा जास्त दिवसापासून शेतकरी आंदोलन करीत आहे. पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही मग हंसराज अहिर यांना बरांज व मानोरा या गावच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एवढा पुळका कशासाठी? अगोदर ती कंपनी तर सुरू होऊ द्या मग काय ते कंपनी व्यवस्थापनासोबत कायदेशीर मार्गाने लढा पण हजारो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटत असताना तिथे टांगा कशाला? केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी जर आंदोलनाचा फार्स असेल तर मग त्या हजारो बेरोजगार यांची जबाबदारी हंसराज अहिर घेणार कां? याचे उत्तर त्यांनी भद्रावती तालुक्यातील जनतेला द्यावी आणि मगच KPCL कंपनी विरोधात आंदोलन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here