Home आंतरराष्ट्रीय धक्कादायक :- कोरोना व्हायरस कसा पसरला याचा अहवाल WHOकडून झाला...

धक्कादायक :- कोरोना व्हायरस कसा पसरला याचा अहवाल WHOकडून झाला लिक?

WHO च्या अहवालात कोरोना वुहानच्या प्रयोग शाळेतून पसरला की नाही?

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

आज अख्ख्या जगात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना (कोव्हीड 19) ची उत्पत्ती कुठुन झाली? हे शोधण्याससाठी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम चीन कॅग्या अभ्यास दौऱ्यावर आहे. त्यांच्या या अभ्यासदौऱ्यातील संशोधनाचा एक अहवाल कथित रित्या लीक झाला आहे. या अहवालात वटवागुळातून हा विषाणू जनावरांत गेला आणि तिथून तो माणसात पसरल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.
WHO च्या या अहवालात कोरोना वुहानच्या प्रयोग शाळेतून पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.असोसिएट प्रेस च्या हाती लागलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. WHO च्या या अहवालात अपेक्षित असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचे समजत आहे. WHO च्या या चमूने प्रयोग शाळेतून व्हायरस पसरण्याचा मुद्दा बाजूला सारून ईतर शक्यतेवर जास्त भर देऊन संशोधन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
या अभ्यास निष्कर्षाचा अहवाल प्रसिद्ध होण्यास सातत्याने विलंब होत आहे त्यामुळे चीन हा अहवाल प्रसिद्ध होऊ नये यासाठी प्रयत्नशील तर नाही ना ? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे. कोरोना पसरण्याचा खापर आपल्या डोक्यावर फोडल्या जाऊ नये म्हणून चायना खेळी खेळत असावा अशी शंका उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्याने येत्या काही दिवसात चमुचा अहवाल सार्वजनिक केल्या जाईल अशी आशा वर्तविली होती.
संशोधकांनी SARS -COV 2 विषाणू च्या उत्पत्ती साठी चार कारणांची नोंद केली आहे. पहिले कारण एका जनावरा मधून दुसऱ्या जनावरांत संक्रमण पसरण्याची शक्यता.वटवागुळाच्या माध्यमातून थेट मानवी शरीरात पसरण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. कोल्डचेन खाद्य पदार्थाच्या माध्यमातून पसरण्याची शक्यता आहे पण ती फार दुर्मिळ आहे. या संशोधनात असे देखील समोर आले आंहे की मींक आणि मांजरे देखील कोरोना व्हायरस संदर्भात अति संवेदनशील आहे. याचाच अर्थ असा की ते कोरोना व्हायरस चे वाहक ठरू शकतात. या मिशन चे नेतृत्व करणारे WHO च्या चमू चे तज्ञ पिटर बेन ऍम्ब्रेक यांचं म्हणणं आहे की रिपोर्ट ला अंतिम रूप देण्यात आले आहे.आणि यात मांडलेल्या तथ्यांची पुनरतपासनी सुरू आहे.आणि येत्या काही दिवसात हा अहवाल आम्ही सार्वजनिक करू अशी मला आशा आहे.
WHO च्या टीमला आतापर्यंत ही बाब कळली नाही की वुहान शहराच्या सिफूड मार्केट मध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा हा व्हायरस आढळला होता की नाही ? या अहवालत सांगण्यात आले आहे की या विषाणू ची सुरवात सिफूड बाजारातून झाली किंवा नाही यावर काही ठोस निष्कर्ष निघाला नाही.हा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी या टीमला बऱ्याच प्रश्नही उत्तरे शोधावी लागणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here