Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- एका सिमेंट टँकरची तेलंगणा महाराष्ट्र सीमेच्या वन तपासणी नाक्याला...

ब्रेकिंग न्यूज :- एका सिमेंट टँकरची तेलंगणा महाराष्ट्र सीमेच्या वन तपासणी नाक्याला जबर धडक.

 

वन कर्मचारी लघुशंकेला गेल्याने जिवहानी टळली.

राजुरा प्रतिनिधी :-

वन विभागाचा तपासणी नाका असलेल्या तेलंगणा -महाराष्ट्र सीमेवरील असिफबाद कडून येणाऱ्या सिमेंट टँकर अनियंत्रित झाल्यामुळे जोरदार धडक लागल्याने तेलंगना चंद्रपूर असिफबाद महामार्गातील लक्कडकोट येथील वन विभागाचे तपासणी नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे.ही घटना आज रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली.

ही धडक एवढी जोरदार होती की तपासणी नाक्याची पुरती तोडफोड झाली या धडकेत वन विभागाच्या तपासणी नाक्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान येथे कार्यरत वन कर्मचारी लघुशंकेसाठी गेले होते त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली घटनेची माहिती मिळताच लक्कडकोट येथील ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. याच ठिकाणी राजुरा पोलीस अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी तैनात असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here