Home महाराष्ट्र राजकीय कट्टा :- कार्यकर्त्यानो कुठलाही विरोध वैचारिक करा पण व्यक्तिगत करू नका.

राजकीय कट्टा :- कार्यकर्त्यानो कुठलाही विरोध वैचारिक करा पण व्यक्तिगत करू नका.

 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन.

राजकीय कट्टा :-

आपल्या देशात एकीकडे टी वी न्यूज चैनेल च्या माध्यमातून जनतेत खोटा भ्रम तयार करून ज्वलंत मुद्द्याला दिशाहीन केल्या जात आहे तर दुसरीकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षातील नेत्यांवर व्यक्तिगत शाब्दिक हल्ले करताहेत त्यामुळे देशात एक प्रकारे राजकीय वातावरण बिघडले असून त्यामुळे महत्वाच्या प्रश्नाला बगल दिल्या जात आहे. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी ग्रूहराज्य मंत्री बाळा नांदगावकर यांच्या जिव्हाळी लागली असून त्यांनी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना फेसबुक पेजवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आवाहन केले की कार्यकर्त्यानो कुठलाही विरोध वैचारिक करा पण व्यक्तिगत करू नका.

ते पुढे म्हणाले की दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर हा खालावत चालला आहे. आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा वारसा आहे, परंतु सध्याच्या या सोशल मीडिया च्या युगात नविन पिढी हि पक्ष , आवडता नेता यांच्यासाठी लढताना अगदी वैयक्तिक पातळीवर घसरत आहे. मित्रानो राजकीय विरोध असावा परंतु वैर नसावे, तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांच्यात दुरावा येऊ देऊ नका. तुम्ही ज्यांच्यासाठी वैयक्तिक संबंध पणाला लावत आहात तेच अनेकदा “अभद्र आघाडी” करून कार्यकर्त्यांना अडचणीत आणतात. तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणात जरूर यावे परंतु आधी आपली पारिवारिक जवाबदारी कशी पार पडेल हे बघावे. कारण कुटुंब हिच पहिली प्राथमिकता असायला हवी असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिण्याचे कारण सांगितले कि ज्या कार्यकर्त्याच्या जिवावर नेता घडतो त्याच्याबाबद्दल असलेली आपुलकीची भावना असावीच व राजकारण करताना वैचारिक विरोध असावा पण असे करतांना ती वैयक्तिक होऊ नये तर ती वैचारिक असावी.याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- एका सिमेंट टँकरची तेलंगणा महाराष्ट्र सीमेच्या वन तपासणी नाक्याला जबर धडक.
Next articleधक्कादायक ;- पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीलाच ठाणेदाराने केली शरीरसुखाची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here