Home ब्रम्हपुरी धक्कादायक :- नामांकित वकील चंद्रकांत निमजे यांचा डोंगेघाट येथे बुडून मृत्यू.

धक्कादायक :- नामांकित वकील चंद्रकांत निमजे यांचा डोंगेघाट येथे बुडून मृत्यू.

 

आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतेय याकडे लागले सर्वांचे लक्ष.

ब्रह्मपुरी न्यूज नेटवर्क :-

कोणाचा कधी? कुठे? कसा मृत्यू होईल हे साक्षात ब्रम्हदेवाला सुद्धा कळणार नाही अशी परिस्थिती आली असून ब्रह्मपुरी येथील नामांकित वकील चंद्रकांत निमजे वय 43 हे आज सकाळी घरून सहज फिरायला निघाले व फिरत फिरत ब्रह्मपुरी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगे घाट या ठिकाणात आले असता त्यांना आंघोळीची इच्छा झाल्यामुळे कपडे काढून ते पाण्यामध्ये उतरले परंतु बरोबर पोहता येत नसल्यामुळे व पाणी खोल असल्यामुळे पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सायंकाळच्या सुमारास नियमित पोहायला येणारे लोक सायंकाळी पाच वाजता डोंगे घाटावर आले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला त्यावरून या घटनेची माहिती झाली पोलिस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस दल या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा केला. हे वकील खरोखरच पोहायला आले की आणल्या गेले? याबद्दल तर्कवीतर्क लावल्या जात असून ब्रह्मपुरी पोलिसांच्या तपासाची चक्रे कशी फिरतात यावर सर्व अवलंबून असून या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे या घटनेचा तपास ब्रह्मपुरी चे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे यांच्या नेत्रूत्वात अरूण पिसे व इतर पोलीस कर्मचारी करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Previous articleखबरदार ;- अवैध धंदे सुरू झाले तर तत्काळ निलंबित करणार? सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा पोलिसांना इशारा.
Next articleब्रेकिंग न्यूज :- एका सिमेंट टँकरची तेलंगणा महाराष्ट्र सीमेच्या वन तपासणी नाक्याला जबर धडक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here