Home चंद्रपूर सनसनीखेज ;- मला माझ्या कुटुंबांसह आत्महत्या करण्याची परवानगी द्या.

सनसनीखेज ;- मला माझ्या कुटुंबांसह आत्महत्या करण्याची परवानगी द्या.

 

आई वडिलांच्या क्रूर वागणुकीला कंटाळून शशांक झोटिंग यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

चंद्रपूर न्यूज नेटवर्क :-

मागील काही दिवसापासून झोटिंग परिवारात मोठे वादळ घोंगावत असून आपल्या पोटच्या मुलाला क्रूरपणे आपल्या संपतीतून बेदखल करण्यासाठी केवळ कायदेशीर प्रयत्नच केले नाही तर स्वतःच्या आई वडिलांनी छडयंत्र रचून त्याला मरणाच्या दरात ढकलले आहे. आई वडील येवढे क्रूरअसतात याचा प्रत्यय पहिल्यांदा झोटिंग दांपत्याना बघून होत आहे कारण आईवडील मुलांच्या प्रेमाखातर काय काय करत असते पण इकडे मात्र शशांक झोटिंगला त्याच्या सख्ख्या आई ने चक्क आजी च्या घरातून बाहेर काढण्यासाठी छडयंत्र रचले आहे आणि त्यामुळे आई हीच मुलाची वैरीन झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आजीची सेवा करणारा शशांक झोटिंग हा मागील अनेक वर्षापासून आजीच्या सेवेसाठी चंद्रपूर मधे आजीच्या घरी राहत होता. व आपल्या भावाच्या व्यवसायात हातभार लावत होता मात्र भावाने त्याला नोकरा प्रमाणे वागवले व त्याला त्यातून काढून टाकले त्यानंतर शशांक ने स्वतःचा व्यवसाय आजीच्या घराच्या वरती शेड बांधून सुरू केला दरम्यानच्या काळात आई वडील दोन्ही शिक्षक असल्याने ते हिंगणघाट ला राहत होते आता ते सेवानिवृत्त झाले असून दोघानाही जवळपास 70 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळते पण शशांक ला त्याच्या धंद्यासाठी मदत करून त्याचे उज्वल भविष्य घडविण्याचा प्रयत्न आई वडिलांनी करायला हवा होता पण कोट्यावधी रुपयाच्या संपती तून त्याला बेदखल करण्यासाठी व त्याच्या आजीच्या घरातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या आई वडिलांनी वारंवर आजीला भडकावुन पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल करायला लावली शिवाय ज्येष्ठ नागरिक सरक्षण कायद्यांअंतर्गत घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालवला आणि आता जोरजबरदस्तीने पोलिसांना पैसे देवून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालवला आहे.

शशांकने आत्महत्या करण्याची परवानगी मागितली

आर्थिक संकटात असल्याने व आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून आता जगणे कठीण झाल्याने शशांक यांनी आपल्या पत्नी व दहा वर्षाच्या मुलांसह आत्महत्या करण्याची परवानगी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मागितली आहे, एवढेच नव्हे तर या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना पाठवून आपल्याच आई वडिलांच्या क्रूर प्रवृत्तीची जणू धिंड काढली आहे. कधीतरी मरण हे येणारच व आपण कमावलेली संपती इथेच सोडून जाणार पण पैशाचा मोह करून व आता आपल्या पोटच्या मुलाला आत्महत्या करतांना बघून शशांक चे आई वडील नातेवाईक व समाजाला काय सांगणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleब्रेकिंग ;- अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, महाराष्ट्रात खळबळ
Next articleमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर चपराक मधील लिहिलेल्या लेखांवर महाराष्ट्र सैनिक संतप्त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here