Home महाराष्ट्र ब्रेकिंग ;- अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, महाराष्ट्रात खळबळ

ब्रेकिंग ;- अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, महाराष्ट्रात खळबळ

 

पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआई चौकशी?

पोलीस पंचनामा :-

पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्यावरील खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी ट्विट करून राजीनामा दिल्याचे जाहीर केले असून न्यायालयाच्या आदेशानंतर या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे व अन्य एका अधिकाऱ्याला महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. मात्र, सचिन वाझे प्रकरणात बदलीची कारवाई झाल्यामुळे आकसातून सिंग यांनी हे आरोप केल्याची भूमिका सरकारतर्फे घेण्यात आली होती. तसंच, सिंग यांनी दबावाखाली येऊन हे आरोप केल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, देशमुख यांच्यावर आपण केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. अॅड. जयश्री पाटील यांनीही अशीच याचिका दाखल करत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने आज सीबीआय चौकशीचे निर्देश दिले. ‘हे अभूतपूर्व प्रकरण आहे. खुद्द मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत,’ असं न्यायालयानं नमूद केलं होतं.

Previous articleधक्कादायक ;- वरोरा येथील धोनी म्हणून प्रशिद्ध प्रेस फोटोग्राफर विनोद चिकाटे यांचे आकस्मिक निधन.
Next articleसनसनीखेज ;- मला माझ्या कुटुंबांसह आत्महत्या करण्याची परवानगी द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here