Home वरोरा धक्कादायक ;- वरोरा येथील धोनी म्हणून प्रशिद्ध प्रेस फोटोग्राफर विनोद चिकाटे यांचे...

धक्कादायक ;- वरोरा येथील धोनी म्हणून प्रशिद्ध प्रेस फोटोग्राफर विनोद चिकाटे यांचे आकस्मिक निधन.

 

धोनी यांच्या निधनाचे व्रुत धडकताच वरोरा येथे पसरली शोककळा.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

कोणाचा कसा? कुठे? कशाने? केव्हां? जीव जाईल याचा नेम नाही मात्र अगदी विनोदी मुद्रा घेऊन सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फूलविनारा दिलखुलास मित्र आणि वरोरा शहरात धोनी म्हणून प्रशिद्ध विनोद चिकाटे हा आपल्या मित्रांना व विश्वासू यांना काही एक कळण्याच्या आधीच अकस्मात सर्वांना दुःखद धक्का देऊन सोडून गेला त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मित्रांचे डोळे पान्हावले आहे आणि सगळीकडे शोककळा पसरली आहे.

विनोद चिकाटे उर्फ धोनी यांची मागील दोन तीन दिवसापासून तब्बेत बरी नव्हती असे त्यांच्या मित्रांकडून सांगण्यात येते तरी पण त्याने काल सकाळी दुचाकीने शहरात भ्रमंती केली व अनेकांना दिसला पण सायंकाळी अचानक तब्बेत बिघडल्याने तो डॉ. मुळेवार यांच्या रुग्णालयात तब्बेत दाखवली असता इथे इलाज होणार नाही आणि प्रक्रुती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान त्याच्यासोबत त्यांच्या आई वडिला व्यतिरिक्त कुणीही नव्हते असे सांगण्यात येते पण शेवटी खालावलेली प्रक्रुती आणि वेळेवर झाला नसलेला इलाज यामुळे काल रात्रीच्या वेळेस त्याचे आकस्मिक निधन झाले ही वार्ता कळताच वरोरा शहरात त्यांच्या मित्र परिवार व नातेवाईक यांच्यात शोककळा पसरली.

कुणाच्याही मदतीला धावून जाणारा उत्कृष्ट फोटोग्राफर आणि वेळेच्या पूर्वीच आपली कार्यक्रमात हजेरी लावणारा दिलखुलास हरहुन्नरी व सगळ्यांचा चाहता विनोद अचानक सर्वांना सोडून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल संपादकीय मंडळ व प्रतिनिधी यांच्याकडून धोनीला दुःखद अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली …

Previous articleखळबळजनक :- करोनाची लस घेतलेल्या सात जणांचा दुर्दैवी मृत्यु.
Next articleब्रेकिंग ;- अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, महाराष्ट्रात खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here