फोर व्हीलर गाडी चालविणे धोकादायक तर दु चाकी चालकाचा अपघात होण्याची दाट शक्यता?
वरोरा प्रतिनिधी :–
विकासाच्या नावाने नागरिकांना मते मागणारे उमेदवार निवडवून आल्यावर मते देणाऱ्या नागरिकांच्याचं जीवावर उठल्याचे विदारक दृष्य वरोरा तालुक्यात दिसत असून वरोरा तालुक्यातील वरोरा- माढेळी रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडून रस्त्यांची अक्षरशः चाळणी होऊन रस्ता आता जीवघेना ठरत असतांना सुद्धा या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी झोपेत आहें का? असा संतप्त सवाल या क्षेत्रातील जनता विचारत आहें,
वरोरा तालुक्यात सत्ताधारी आणि विरोधक एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही कडील नेत्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे कंत्राटदार आहें, या कंत्राटदारांच्या गुणवत्ता नसलेल्या रस्ते बांधकामाने इकडे जनता मात्र हवालदील झाली असतांना त्या जनतेच्या ज्वलंत समस्याकडे लोकप्रतिनिधी मात्र डोळेझाक करत आहें, दररोज शेकडो जड वाहनांची वाहतूक आणि कमिशनखोरीमुळे त्या लायक बांधण्यात न आलेला रस्ता यामुळे रस्त्याची दुर्दशा तर होणारच पण प्रश्न हा उठतो की त्या रस्त्याची किमान डागडुजी तर करण्यात यावी अशी अपेक्षा लोकप्रतिनिधी कडून जनतेची असतें पण जर ते काम सुद्धा होतं नसेल तर मग यांना काय कमिशन खाण्यासाठी आणि स्वतःची वाहवाही करण्यासाठी जनतेने निवडून दिले का? असा सवाल जनता करत आहें त्यामुळे या गोष्टीचे भान लोकप्रतिनिधी यांनी लक्षात घेऊन वरोरा-माढेळी रस्त्याची झालेली दुर्दशा व अपघाताला निमंत्रण देणारी अवस्था दुरु करण्यासाठी किमान या रस्त्याने मुरूम तरी टाकून रस्ता जाण्यायेण्या लायक करावा अशी नागरिकांची मागणी आहें, जर तेही करता येत नसेल तर लोकप्रतिनिधी यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे अशी संतप्त प्रतिक्रिया या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली आहें.