नेत्यांना एक नियम व व्यापारी दुकानदार यासह सर्वसामान्य जनतेला दुसरा नियम हे कसे काय चालणार?
लक्षवेधी :-
देशात कोरोना चे संकट थांबता थांबत नाही आणि निवडणूकां च्या तारखा सुद्धा पुढे ढकलल्या जात नाही पण आश्चर्य म्हणजे जिथे निवडणुका असतात तिथे कोरोना नेमका जातो कुठे? याचा शोध आजही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञाना लावता आला नाही हे विशेष. पण इकडे कोरोना च्या नावावर सर्वसामान्य माणसांसाठी लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा पोरखेळ मात्र सुरू आहे.
मागील वर्षी कोरोना च्या काळात बिहार विधानसभा निवडणुका झाल्या पण राजकीय पक्षांच्या जाहीर सभेत लाखो लोकांच्या गर्दीने कोरोना पसरला नाही आणि आता पश्चिम बंगालसह इतर चार राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहे तिथे सुद्धा लाखों च्या गर्दीत कोरोना शिरत नाही मग महाराष्ट्रात कुठलीही निवडणूक नसताना हा कोरोना कसा काय पसरतोय? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मात्र अशातच महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे तिथे फक्त व्यापारी दुकानदार, मजुरी करून खाणारे, तसेच हॉटेल व्यवसायिक या सर्व लोकांचे उदरनिर्वाहाचे हे उद्योगधंदे बंद केले आहे पण निवडणुकीच्या सभा आणि रैली मात्र जोरात आहे मग इथे लॉक डाऊन च्या काळात निवडणूक घेण्याची गरज का होती? याचे उत्तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे सुद्धा नाही मग प्रश्न हा उठतो की सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची नेतेमंडळी ही जनतेला मूर्ख बनवीत आहे का? याचे उत्तर सद्ध्या सापडता सापडत नाही.
अगोदरच कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये असंख्य लोकांना आर्थिक झळ आणि मानसिक त्रास झाला आहे. सर्वांचे रोजगार व ऊद्दोग बंद झाल्याने आर्थिक संकटामध्ये सर्व जनता सापडली असताना सरकारने पुन्हा एकदा कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून लाँकडाऊन केले आहे मग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक लागली तिथे प्रचार दौऱ्यावर असंख्य नेते प्रचारासभे साठी येत आहेत. त्यांच्या प्रचार सभेला प्रचंड गर्दी होत आहे महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या लॉक डाऊन चे नियम पाळा म्हणून आदेश करणारे आणि सत्ताधारी यांनी सुद्धा स्वतःच या निवडणुकीत नियम पाळले नाही अशावेळी या प्रचार दौऱ्यामध्ये पोलीसां कडून केवळ जुजबी कारवाई केली जात आहे आणि या नेतेमंडळीच्या प्रचार सभा मात्र तरीही जोमात सुरू आहेत. या सभेला प्रचंड गर्दी होत आहे. मग या गर्दीमुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होत नाही का ? आणि सर्वसामान्य जनतेसाठीच कोरोना रोगाचा फैलाव होतो का? नेत्यांना एक नियम आणि व्यापारी दुकानदार यासह सर्वसामान्य जनतेला दुसरा नियम असतो का?