Home क्राईम स्टोरी क्राईम डायरी :- भररस्त्यात तरुणानं पत्नीला चाकूनं भोसकलं, 45 पेक्षाही जास्त वार...

क्राईम डायरी :- भररस्त्यात तरुणानं पत्नीला चाकूनं भोसकलं, 45 पेक्षाही जास्त वार करत पत्नीची निर्घृण हत्या.

 

उपस्थित लोकांनी घेतली बघ्यांची भूमिका, महिला जागीच ठार

क्राईम डायरी :-

देशाची राजधानी दिल्लीत एका व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून आरोपी व्यक्तीनं अवैध संबंधाच्या संशयातून भररस्त्यात आपल्या पत्नीला आडवून चाकून सपासप वार केले आहेत. यावेळी रस्त्यावर अनेक लोकं होती, पण आरोपीचा राग पाहाता मृत महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढं सरसावलं नाही. संशयाने झपटलेल्या आरोपी पतिने आपल्या पत्नीची 45 पेक्षा अधिक वेळा वार करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

संबंधित 40 वर्षीय आरोपी पतिचं नाव हरिश मेहता असून मृत महिलेचं नाव नीलू आहे. 26 वर्षीय मृत नीलूचं आठ महिन्यापूर्वी आरोपी हरिशसोबत लग्न झालं होतं. आरोपी व्यक्ती हा मुळचा गुजरातमधील अलकापूरी येथील रहिवासी असून तो दिल्लीत एका मॅरेज ब्युरोमध्ये काम करतो. तर नीलू एका दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयात काम करत होती. पत्नी नीलूने रुग्णालयात काम करणं पती हरिशला आवडत नव्हतं, त्यामुळे आरोपीने तिला काम करण्यास मनाई केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Previous articleलक्षवेधी :- जिथे निवडणूक तिथे कोरोना गायब? अन्यथा कोरोना ची भीती कायम?
Next articleधक्कादायक :- उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाची सलाईन च्या नळी ने आवळून आत्महत्या?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here