Home विदर्भ धक्कादायक :- उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाची सलाईन च्या नळी...

धक्कादायक :- उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाची सलाईन च्या नळी ने आवळून आत्महत्या?

 

कोरोना बाधित रुग्णाच्या या आत्महत्तेने समाजमन हळहळले.

अकोला वार्ता :-

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची मानसिक परिस्थिती खालावत असून मानसिक तणावातून ते आत्महत्या करीत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे अशातच अकोला येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने समाजमन हळहळले आहे.

अकोल्यातील शासकीय रुग्णालयात वॉर्ड क्रमांक दहामध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे या व्यक्तीला कर्करोगाचीही लागण झाली होती.अकोल्यातील पातूरमधील रहिवासी असलेल्या 57 वर्षीय रुग्णावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला कोरोनाची बाधा झाली होती. शनिवारी त्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केली आहे. तसेच वॉर्डात इतर रुग्णांना काहीही संशय येऊ नये म्हणून त्याने अंगावर चादर घेतली होती. त्यानंतर त्याने सलाईनच्या नळीने गळा आवळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. काही तासानंतर हा प्रकार समोर आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली. दरम्यान या रुग्णाने नेमकी आत्महत्या का केली, याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याने कॅन्सरच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या याचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here