Home महाराष्ट्र राजभाषा :- राजसाहेबांच्या खळळळखट्याक ह्या शास्त्राचे खरे ब्रैंड अॅम्बेसीडर ठरले अविनाश जाधव...

राजभाषा :- राजसाहेबांच्या खळळळखट्याक ह्या शास्त्राचे खरे ब्रैंड अॅम्बेसीडर ठरले अविनाश जाधव ….

 

जेंव्हा व्यवस्था मुजोर होते तेव्हां महाराष्ट्र सैनिक खळळळखट्याक हा आवाज करतो ….

लक्षवेधी:-

खरं तर या लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतात खरी लोकशाही अस्तित्वात आहे का? हा प्रश्न सर्वांना पडतो आहे, कारण जिथे व्यवस्थेने कायद्याच्या चौकटीत राहून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करून त्यांचे अधिकार त्यांना देणे हे अपेक्षित असतांना ती व्यवस्था एवढी मुजोर झाली आहे की त्यां व्यवस्थेला स्वतःचे कर्तव्ये सुद्धा पार पाडण्याची नैतिक जबाबदारी कळत नाही, त्यामुळे मग सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार कसा? पर्यायाने मग या मुजोर व्यवस्थेला ठेचण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सामाजिक दायित्व पार पडणारी ताकत निर्माण व्हावी लागते आणि ती ताकत महाराष्ट्रात खळळळखट्याक ह्या आवाजाने शस्त्र म्हणून उभी केली ती मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी, आणि त्यावर कळस चढवला तो ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी.

आज महाराष्ट्रात तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनलेल्या अविनाश जाधव यांच्या ठाणे पालघर जिल्ह्यातील आंदोलनाची री ओढत अनेक तरुण व्यवस्थेविरोधात बंड करून उठत आहे, नव्हे महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेविरोधात आणि महाराष्ट्राच्या अस्मीतेच्या आड येणाऱ्यांच्या विरोधात राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले आणि अविनाश जाधव यांनी प्रभावीपणे वापर केलेल्या अस्त्राचा वापर युवा पिढीतील तरुण करीत आहे, त्यामुळे मुजोर व भ्रष्टाचारी व्यवस्थेला एक प्रकारे धाक निर्माण झाला आहे अर्थातच त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय आणि अधिकार मिळत आहे हे विशेष.

उर्जेवर सृष्टी जगते असं आपण म्हणतो पण उर्जेची मापदंड, परिभाषा आणि मोजमाप काढणं फार कठीण आहे, परंतु मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाणितून निघालेले बोल जेंव्हा महाराष्ट्र सैनिकांच्या हृदयाच्या पटलावर पडतात तेव्हां या उर्जेचा महाराष्ट्र सैनिकांमधे स्त्रोत निर्माण होतो आणि मग व्यवस्थेविरोधात बंड निर्माण होऊन खळळळखट्याक हा आवाज निघतो आणि मग व्यवस्थेला आपली जागा कळते. स्वातंत्र्यानंतर अनेक पक्ष आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या कार्यशैलीचे आवाज महाराष्ट्राने ऐकले, पण महाराष्ट्रात खळळळखट्याक” हा आवाज मात्र चांगलाच गुंजला. शेवटचा उपाय म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला हा आवाज शस्त्र म्हणून दिला आणि महाराष्ट्र सैनिकांनी ह्या शास्त्राचा योग्य वापर करीत महराष्ट्रातील व्यवस्थेला दणाणून सोडले पण या खळळळखट्याक आवाजाच्या शास्त्राचे ब्रैंड अॅम्बेसीडर ठरले ते अविनाशदादा जाधव.

जेव्हा व्यवस्था माजोर होते अन् कधी ती मरणासन्न होते तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला या खळळळखट्याक आवाजाची भुरळ पडते. ठाण्यात आंदोलनाची फार मोठी पार्श्वभुमी आहे. पुर्णेकर ते आव्हाड यांची अनेक आंदोलनं झाली. मात्र अविनाश दादाच्या चळवळींनी त्या आंदोलनावर एकप्रकारे कळस” रचलाय. अविनाश दादा जेवढा “आक्रमक” तेवढाच “विचारी” आणि जेवढाच “विखारी” मात्र प्रसंगी तेवढाच “संवेदनशील” असा नेता आहे आणि म्हणूनच राजसाहेबांचा आणि ठाण्याचा तो लाडका आहे. तो आमदार किंवा मंत्री नाही, मात्र उघड्या रस्त्यावर “जंग-ए-मैदानावर” त्याची “एकहाती_सत्ता” भल्याभल्यांना थरकाप सोडणारी आहे.
“सत्ता असताना तर कोण पण रुबाब करतय पण इथं सत्ता नसताना देखील सत्तेच्या पलिकडचा “कारभार” चालतो.
अश्या या महाराष्ट्रातील खळळळखट्याक या आवाजाच्या शास्त्राचा प्रभावी वापर करून तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या अविनाशदादा जाधव यांना भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल तर्फे जन्मदिवसाच्या कोटी कोटी मनसे शुभेच्छा…💐💐💐

Previous articleचिंताजनक :- 13 कोरोना बाधितांच्या मृत्यूसह 24 तासात 1235 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले.
Next articleधक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1171 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णवाढीसह 16 कोरोना बाधितांचा मृत्यू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here