Home चंद्रपूर धोकादायक :- जिल्ह्यातील सुरू असलेला खर्रा व पॉझिटिव्ह रुग्णांसाठी घरून आणलेले जेवण...

धोकादायक :- जिल्ह्यातील सुरू असलेला खर्रा व पॉझिटिव्ह रुग्णांसाठी घरून आणलेले जेवण ठरताहेत धोकादायक?

 

जिल्हा प्रशासनाने यावर त्वरित दखल घेण्याची गरज.

कोरोना वार्ता :-

मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूसंख्या सुद्धा वाढत आहे अशातच जिल्हा प्रशासनाची उपाययोजना त्या मानाने तोकडी पडत असल्याने रुग्णालयातील रुग्णांना योग्यवेळी उपचार होतं नसल्याने जनतेत मोठा आक्रोश निर्माण होतं आहे मात्र कोविड सेंटर मधे पॉझिटिव्ह रुग्णांसाठी घरून येत असलेले जेवण हे सुद्धा कोरोना संक्रमणाला कारणीभूत ठरत आहे तर दुसरीकडे खुलेआम सगळ्यांच्या तोंडात असलेला खर्रा व जागोजागी त्यांच्याकडून होतं असलेल्या थुंका या सुद्धा कोरोना संक्रमणाला कारणीभूत ठरताना दिसत आहे त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही महत्वपूर्ण बाबी कडे गांभीर्याने घेवून यावर त्वरित अंकुश लावावा अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांकडून होतं आहे.

महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू ची बंदी असतांना मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू जिल्ह्यात येत आहे दारूबंदी असली तरी दारूची आयात होतं आहे त्यामुळे प्रशासन या गोष्टीवर पायबंद घालण्यास समर्थ नाही हे स्पष्ट आहे मात्र कोरोना काळात ज्या पद्धतीने खर्रा खुलेआम विकला जावून त्या पासून कोरोना संक्रमण होण्याची भीती आहे मग प्रशासन याबाबत गंभीर कां नाही? हा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्हाधिकारी यांनी याबाबत तातडीच्या आदेश देऊन जिल्ह्यातील खर्रा बंद करावा व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटर मधे घरून दिला जाणारा जेवणाचा डब्बा बंद करावा अशी मागणी होतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here