Home वरोरा दुःखद बातमी :-माजी पर्यावरण मंत्री आणि भाजपचे नेते संजय देवतळे यांचे नागपूर...

दुःखद बातमी :-माजी पर्यावरण मंत्री आणि भाजपचे नेते संजय देवतळे यांचे नागपूर येथे कोरोना ने दुःखद निधन.

एक अजातशत्रू हरवला. वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघात शोककळा,

वरोरा प्रतिनिधी :-

भाजप नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांचे आज नागपूर येथे कोरोनाशी लढताना दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वरोरा भद्रावती मतदार संघातशोककळा पसरली असून अतिशय नम्र आणि अजातशत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय देवतळे यांनी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जनतेला खूप काळ सेवा दिली, तब्बल चार वेळा या विधानसभा क्षेत्राचे नेत्रूत्व करतांना व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वावरताना त्यांनी कधी येथील अधिकारी आणि पत्रकार यांच्यावर दबाव टाकला नाही नव्हे त्यांच्या कार्यकाळात इथे लोकशाही पद्धतीने सर्वांना समान संधी मिळाली सोबतच अनेक जाती धर्मातील लोकांशी त्यांचा जिव्हाळ्याचा सबंध राहिला आहे.

गेल्या निवडणुकीत भाजप सोडून शिवसेनेकडून लढलेल्या संजय देवतळे यांनी दुसऱ्या क्रमांकाची निर्णायक मते घेऊन अजूनही आपण इथे कायम स्पर्धेत आहो हा संदेश दिला होता. चार वेळा आमदार एक वेळ पालकमंत्री म्हणून त्यांचा कारभार चांगलाच होता आजही त्यांची लोकप्रियता या क्षेत्रात कायम असून त्यांचे गावागावात कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल बोलायच झाल्यास त्यांनी जनतेचे मोठ्या प्रमाणात कामे केली नसली तरी त्यांनी कुणाच्या कामात अडथळा टाकला नाही,कुण्या पत्रकारांना धमकावले नाही किंव्हा गुंडगिरी दाखवून कुणाला मारायला गुंडे पाठवले नाही. राजकारण करतांना त्यांनी कुणावरही खालच्या पातळीवर टीका केली नाही आणि सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्या सोबत त्यांचे मैत्रीपूर्ण सबंध होते आज त्यांच्या निधनाने एक अजातशत्रू वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातून काळाच्या पडद्याआड गेला त्यामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here