Home चंद्रपूर क्राईम न्यूज :- बहुआ गुप्ताच्या राजा ठाकूर या पुतण्याची अवैध दारू विक्री...

क्राईम न्यूज :- बहुआ गुप्ताच्या राजा ठाकूर या पुतण्याची अवैध दारू विक्री जोरात?

 

राजा ठाकूर याला परवानगी दिली कुणी? पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

क्राईम न्यूज वार्ता :-

एकीकडे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या परवानगीने अवैध दारूचे परवाने रद्द झाल्याच्या चर्च्या होत असतांनाच आता अवैध दारू विक्रीचा मुख्य सूत्रधार बहुआ गुप्ताचा पुतण्या हा होलसेल अवैध दारू चा व्यवसाय जोरात करीत असल्याची चर्चा होत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन अवैध दारूचा मोठा व्यवसाय चंद्रपूर शहरात सुरू आहे त्याला पोलिसांकडून अभय दिल्या जात आहे की त्याचा पत्ता पोलिसांना मिळत नाही? हे कोडे मात्र सुटता सुटत नाही.

महाकाली मंदिर परिसरात बहुआ गुप्ता यांचे घर आहे. इथेच राजा ठाकूर पण राहतो अशी माहीती आहे. खरं तर बहुआ गुप्ता हा मोठा डिलर्स आहे व त्यांच्या कडूनच चिल्लर विक्रेते अवैध दारूचा माल घेऊन जातात त्यामधे राजा ठाकूर याला समोर करण्यात आले आहेत कारण तो बहुआ गुप्ता चा पुतण्या आहे. यांच्याकडून शहरातील भिवापुर वार्ड व रामनगर परिसरात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा केल्या जात आहे पण अजूनपर्यंत यांच्यावर मोठी कारवाई झाली नसल्याची चर्चा आहे.

अशातच आता राजा ठाकूर या व्यक्तीने दारूचे मार्केट आपल्याकडे खेचल्याची चर्चा आहे त्यामुळे बहुआ गुप्ता हा अंदरुनी पोलिसांसोबत मिळून राजा ठाकूर ला समोर तर करीत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय अवैध दारूचा मोठा व्यवसाय शक्य नसल्याने बहुआ गुप्तासह राजा ठाकूर ला परवानगी दिली कुणी? याबद्दल तर्कवीतर्क लावल्या जात आहे.

Previous articleचिंताजनक :- जिल्ह्यात 24 तासात 39 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली.
Next articleलक्षवेधक :- तर हजारो वृद्ध नागरिकांचे प्राण वाचले असते – मुंबई हायकोर्ट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here