Home वरोरा वरोरा तालुक्यात हजारो ब्रॉस अवैध रेतीचे साठे करण्यास परवानगी कुणाची?

वरोरा तालुक्यात हजारो ब्रॉस अवैध रेतीचे साठे करण्यास परवानगी कुणाची?

 

एकीकडे वनविभागाने रेतीचे पकडले ट्रँक्टर तर दुसरीकडे रेतीची मोठी साठवणूक असतांना महसूल विभाग गप्प का?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात अवैध रेती तस्कर यांची उपविभागीय अधिकारी शिंदे व तत्कालीन तहसीलदार सचिन गोसावी यांनी पुरती वाट लावली होती आणि नवीन तहसीलदार प्रशांत बेडके यांनी पण आल्या आल्या अवैध रेती चे ट्रँक्टर पकडून अवैध रेती तस्करांना इशारा दिला होता पण दरम्यान काही घाटाचा लिलाव झाल्याने प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आणि अवैध रेती तस्करांनी लिलाव झालेल्या घाटा व्यतिरिक्त अनेक घाटावरील व नाल्यांच्या आतील रेतीचे उत्खनन करून त्याची साठवणूक केली आहे. सद्ध्या रेतीला जास्त मागणी नाही आणि भावही कोसळले असंल्याने पावसाळ्यात रेती मिळत नाही म्हणून चढ्या भावाने रेतीची किंमत लक्षात घेता हजारो ब्रॉस रेतीचे मोठे साठे रेती तस्कर करीत आहे.

दिनांक 12 मे ला वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी वाळूचा ट्रँक्टर पकडून तो वनविभागाला जमा केला त्यामुळे संचारबंदीत सुद्धा रेती माफियांची रेती जोरात आहे तर लिलाव झालेल्या रेती घाटातून रेती आणत असल्याचा बनाव करून रेती माफिया वरोरा शहरात रिकाम्या प्लॉटवर व आजूबाजूच्या गावा शेजारी हजारो ब्रॉस रेतीचे ढिगारे तयार करून ठेवल्याचे दिसत आहे आता हे ढिगारे उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत बेडके हे जप्त करणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here