Home वरोरा क्राईम ब्लॉस्ट :- वरोरा येथे साजिद(हाफिज) शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून.

क्राईम ब्लॉस्ट :- वरोरा येथे साजिद(हाफिज) शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून.

 

गोळ्या झाडल्यानंतर आरोपींनी सहा राऊंड माऊजर शस्त्र डेड बॉडी जवळ ठेऊन केला पोबारा.

क्राईम न्यूज :-

वरोरा शहर हे आता खुनाचे शहर झाले आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडायला लागला आहे, कारण अगदी दोन दिवसाच्या अंतराने हा दुसरा खून असून अवैध धंदे याचे मूळ कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी गांधी चौकात भर दिवसा निलेश ढोक नावाच्या मुलाने एका 26 वर्षीय अलाम नावाच्या मुलाचा खून केला होता त्याचा तपास सुरू असतांना आता सलग दुसरा खून झाल्याने वरोरा शहरात शांतता सुव्यवस्था बिघडली असल्याने नागरिक भयभीत झाले असल्याचे चित्र आहे

आज दिनांक 15 मे ला सायंकाळी 7.15 च्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात इसमानी अंबादेवी वार्ड येथील महादेव मंदिर जवळ असलेल्या झोपडीत साजिद शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून केला असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. मृतक साजिद शेख हा आझाद वार्डात राहत असून तो अगोदर सट्टा चालवीत होता व आता गांजा विकत होता, तो एकटां असल्याच्या फायदा घेत दोन ते तीन आरोपींनी त्याच्यावर सहा राऊंड माऊजर ने दोन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक छातीत तर दुसरी कानाखाली मारली विशेष म्हणजे आरोपींनी आपले शस्त्र (बंदूक ) डेड बॉडी जवळ ठेवून पोबारा केला. आरोपी हे तोंडाला फडके बांधून असल्याने त्यांचा शोध आता पोलीस कशाप्रकारे घेणार यावर सर्व अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here