Home वरोरा ब्रेकिंग :- खुनी आरोपीला पकडा तरच माझ्या पतीचे पोस्टमार्टम करा

ब्रेकिंग :- खुनी आरोपीला पकडा तरच माझ्या पतीचे पोस्टमार्टम करा

 

वरोरा येथे काल खून झालेल्या आबीद शेख यांच्या पत्नी निकत आबीद शेख यांची ठोस भूमिका पोलीस परेशान?

जाकीर शेख तालुका प्रतिनिधी  :-

काल वरोरा येथे अंबादेवी वार्डात आझाद वार्ड येथील राहणाऱ्या आबीद शेख यांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती, त्यामुळे वरोरा शहरात मोठी दहशत पसरली असतांना आता मृतक आबीद शेख यांच्या पत्नीने आरोपीचे नाव जाहीर करून त्या आरोपीला पकडा तरच माझ्या पतीचे पोस्टमार्टम करा असा हेका धरल्याने पोलीस प्रशासनाची गोची झाली आहे. वरोरा येथे दोन दिवसात दोन खून झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वरोरा येथे दारू सट्टापट्टी आणि गांजा विक्री करणाऱ्या देवा नौकरकार व त्याचे सहकारी राजा थैम, शाहरुख इत्यादींची नावे स्वतः मृतकच्या पत्नी निकत शेख यांनी घेतले व हेच माझ्या पतीचे खुनी आहेत अगोदर यांना पकडा तरच माझ्या पतीचे पोस्टमार्टम करा असा इशारा पोलीस प्रशासनाकडे दिला आहे. वरोरा येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून पैशाची लेणदेण व अवैध धंद्यातून निर्माण झालेली स्पर्धा यामुळेच वरोरा येथील दोन खून झाले या सर्व परिस्थितीला ठाणेदार दीपक खोब्रागडे हेच दोषी असून त्यांनी अवैध धंद्यावाल्यांना पैसे घेऊन मोकळीक दिली आणि त्याचाच हा परिणाम आहे अशी स्थिती आहे.

राजकीय वरदहस्त असलेल्या आरोपी देवा नौकरकार राजा थैम शाहरुख व अशिफ यांना पोलीस पकडतात की वेळकाढू धोरण अवलंबून त्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, कारण यांच्याकडे सहा राऊंडचे माऊजर आले कुठून? ते दिले कुणी याचा शोध लागणे महत्वाचे आहे आणि त्यावरून वरोरा येथे होत असलेली गुंडगिरी व त्यामुळे अवैध धंदेवाईक यांची दादागिरी या सर्व गोष्टीचे राज उघड होणार आहे.

Previous articleधक्कादायक :- कोरोनाच्या लढाईत जिंकणाऱ्या हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या?
Next articleजावईशोध :- यज्ञ केल्यास कोरोनाची तिसरी लाट येणार नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here