Home क्राईम स्टोरी खळबळजनक ;- सख्ख्या मुलानेच केला बापाचा खून?स्थानिक गुन्हे शाखेने आणला गुन्हा उघडकीस?

खळबळजनक ;- सख्ख्या मुलानेच केला बापाचा खून?स्थानिक गुन्हे शाखेने आणला गुन्हा उघडकीस?

 

पैशाच्या वादावरून मुलाचा पारा भडकला आणि बैलबंडीच्या उभारीने वार करून बापाला केले ठार.

क्राईम स्टोरी :-

आज दिनांक 18 मे ला सकाळी राजुरा तालुक्यातील सिंधी गावानाजिक रेल्वे रुळावर गावातील तिरुपती तातोबा धानोरकर (वय -43) यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या अवस्थेत प्रेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. ही घटना लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा मर्ग विरूर पोलीस ठाण्यात दाखल केला होता या संदर्भात चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे हव प्रकरण सोपवले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या सूचनेनुसार विरूर ठाणेदार किष्णा तिवारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तात्काळ घटना पंचनामा करत तपासाची चक्रे फिरविली. त्यात प्रथमदर्शनी ही रेल्वेत कटून मृत झाल्याची घटना् दिसत असली तरी मृत शरीराच्या निरीक्षणावरून घातापाताची दाट शक्यता समोर आल्याने पोलीसांनी काही संशयितांना पोलिसी धाक दाखवताच आरोपीकडून धक्कादायक खुलासा उघडकीस आला.

या घटनेत मृतकाच्याच मुलाने पैश्याच्या वादावरून आपल्या सख्ख्या बापाच्या डोक्याला जबर मारहाण केल्याने मृत्यू झाल्यानंतर रात्री मृत शरीर गावानाजिकच्या रेल्वे रुळावर नेऊन टाकले व त्यावरून रेल्वे गाडी गेल्याने मानेपासून धड कटून, दोन तुकडे झाल्याने आपला बाप मृत्यू झाल्याचा आव आरोपी मुलांकडून करण्यात आला होता.

परंतु पोलिसांच्या नजरेतून आरोपी मुलगा निखिल धानोरकर हाच मुख्य आरोपी वाटत होता व घरात शेती विकल्यानंतर आलेल्या पैश्यावरून वाद असल्याने मूलानेच वडिलांना आधी बैलबंडीच्या उभारीने डोक्यावर मारहाण केली व त्यानंतर रूळवर नेऊन टाकल्याचे मान्य केले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात विरूर ठाणेदार किष्णा तिवारी व स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बोबडे, पीएसआय कापडे, पोहवा नईम खान, पोहवा भुजाडे, पोहवा खनके,मिलिंद चव्हाण, अनुप डांगे,प्रफुल मेश्राम, मयूर येरणे, जमीर खान पठाण करीत आहेत.

Previous articleधक्कादायक :- कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर 26 लोकांच्या शरीरात रक्ताची गाठ,
Next articleइशारा :- शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याआगोदर वनविभागाने सिमांकन आखावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here