Home वरोरा इशारा :- शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याआगोदर वनविभागाने सिमांकन आखावे.

इशारा :- शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याआगोदर वनविभागाने सिमांकन आखावे.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विशाल पारखी यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला इशारा.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यामध्ये वनविभागाची भरपूर पडीक जमीन आहे. त्या जमिनीची वनविभागाणे कधीही मोजणी न करता सिमांकन पण केलेले नाही. अशातच वनविभागाच्या जमिनीला लागून शेतकऱ्यांच्या काही जमिनी आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतात वनविभागाचे अधिकारी कर्मचारी केव्हाही शेतकऱ्यांना व त्यात राबणाऱ्या शेतगडयाला सदर शेती ही वनविभागाच्या मालकीची आहे किंव्हा तूम्हच्या शेतात वनविभागाची जमीन आहे असे म्हणून त्वरित कागदपत्रे दाखवण्यास सांगतात, तसे न केल्यास त्यांना अटक करण्याची पण धमकी देतात. ही वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची दादागिरी आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस चे वरोरा तालुका अध्यक्ष विशाल पारखी यांनी आगोदर वनविभागाच्या जमिनीचे सिमांकन आखा आणि नंतरच शेतकऱ्यांच्या शेतात जावून त्यांना धमकवा असा सल्ला दिला आहे. या संदर्भात त्यांनी तहसीलदार वरोरा यांना निवेदन देऊन वनविभागाला तात्काळ त्यांच्या वनविभागाच्या जमिनीचे सिमांकन आखण्याचे आदेश द्यावे आशी मागणी केली आहे.

खरं तर वनविभागाने आपल्या तालुक्यातील वनविभाग हद्दीतील जागेची मोजणी करून सिमांकन करून त्या जागेवर कंपाउंड़ करणे आवश्यक आहे, कारण तालुक्यातल वनजमिनीचे संरक्षण करणे ही वनविभागाचीच जबाबदारी आहे. परंतु आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी धमकावतात व त्यांना सरकारी मोजणी करा नाहीतर वनविभागाच्या जमिनीवर कब्जा केल्या प्रकरणी पोलीस केस करून अटक करू अशी धमकी देऊन जातात. त्यांच्या अशाच धमकीमुळे मागील वर्षी चिनोरा येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अशी वेळ वरोरा तालुक्यातील इतर शेतकऱ्यांवर येऊ नये त्यासाठी वनविभागाने त्यांच्या वनजमिनीची मोजणी करून आपली हद्द कायम करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कुण्याही शेतकऱ्यांना नाहक त्रास झाल्यास त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार देण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस चे वरोरा तालुका अध्यक्ष यांनी भूमिपूत्राची हाक प्रतिनिधीशी बोलताना प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here