Home राजकारण खळबळजनक :- सुसाईट नोट लिहून आमदाराच्या महिला गर्लफ्रेंडने केली आत्महत्या?

खळबळजनक :- सुसाईट नोट लिहून आमदाराच्या महिला गर्लफ्रेंडने केली आत्महत्या?

 

आमदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ…

भोपाळ न्यूज वार्ता :-

राजकीय क्षेत्रात विवाहबाह्य प्रेम संबंधामुळे आमदार खासदार मंत्री यांचे सार्वजनिक जीवन उध्वस्त होत असतानाच असली प्रकरणे मात्र थांबता थांबत नाही,असाच एक प्रकार समोर आला असून कमलनाथ सरकारमधील माजी वनमंत्री आणि आमदार उमंग सिंघार यांच्या बंगल्यात एका 39 वर्षाच्या महिला गर्लफ्रेन्डने फाशी लावून आत्महत्या केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला उमंग सिंघार यांची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणार काँग्रेस आमदार सिंघार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या महिला गर्लफ्रेंडचे नाव सोनिया भरद्वाज असल्याचं म्हटल्या जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी सिंघार यांच्या विरुद्ध महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी सोनिया यांचा मुलगा आर्यन आणि घरात काम करणाऱ्या व्यक्तींचा जबाब नोंदवला आहे. ज्यामध्ये दोघांमध्ये वाद होत असल्याचं समोर आलं आहे.

आमदार सिंघार हे सोनिया भारद्वाज यांच्यासोबत विवाह करणार होते. दोघांची ओळख एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर झाली होती. सोनिया यांनी आपल्या पहिल्या पतीला सोडून दुसरं लग्न केलं. पण ते देखील टिकलं नाही. सोनिया सिंघार यानंतर तिसरं लग्न करणार होत्या. पण हा विवाह कधी होणार होता. याबाबत काहीही माहिती पुढे आलेली नाही.

काय आहे सुसाईट नोटमधे?

आमदाराच्या महिला गर्लफ्रेंड ने एक सुसाईट नोट लिहिली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, तुम्ही खूप रागीट स्वभावाचे आहात, आता सहन नाही होत.’ पण यामध्ये महिलेने आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरवलेलं नाही. ती सुसाईड नोट पोलीसांनी जप्त केली आहे, काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्या बंगल्यावर ही महिला राहत होती. पोलीस अधिकारी राजेश भदौरिया यांनी सांगितलं की, ‘सोनिया भारद्वाज असं या महिलेचं नाव असून ती अंबालाच्या बलदेव नगरची राहणार आहे. महिलेचं वय 39 वर्ष आहे. गेल्या 25 दिवसांपासून ती या बंगल्यात राहत होती. याआधी देखील ती येथे आली होती. महिलेच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह परिवाला सोपवण्यात येईल.’

या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता आमदार उमंग सिंघार यांनी म्हटलं की, ‘सोनिया माझी चांगली मैत्रीण होती. ती नेहमी येथे राहायची. मी 3 दिवसापासून माझ्या मतदारसंघात होतो. जेथे कोरोनाग्रस्तांना मदत करत होतो. या घटनेनंतर मला ही धक्का बसला आहे. माहिती मिळताच मी येथे आलो.

Previous articleइशारा :- शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याआगोदर वनविभागाने सिमांकन आखावे.
Next articleशेतकऱ्यांच्या आक्रोशापुढे मोदी सरकार झुकले, वाढविलेल्या डीएपी खतांवरील किंमती जुन्याच भावाने.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here