कोविडच्या दुसऱ्या लाटेत शिंदे परिवाराचे सर्वोच्य योगदान.जनतेकडून कौतुक !
भद्रावती प्रतिनिधी :-
केवळ भद्रावती,वरोरा तालुकेच नव्हे तर अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या मदतीला धावून आलेला शिंदे परिवार हा खरोखरंच जिल्ह्यातील जनतेच्या स्मरणात राहील अशी उत्कृष्ट आरोग्य सेवा त्यांच्याकडून होत आहे,भद्रावती शहरात आपले स्वतःचे मंगल कार्यालय प्रशासनाकडे देऊन तिथे चारशे बेड चे सूसज्य कोविड सेंटर उभारल्यानंतर शिंदे परिवाराने आपला मोर्चा आता ग्रामीण भागात पण वळवला आहे.
कोरोना काळात ग्रामीण जनतेला दिलासा मिळावा व त्यांना मदत मिळावी म्हणून भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती व शिन्दे परिवार, यांच्या आरोग्य सेवा उपक्रमाचा भाग म्हणून काटवाल (तु) ग्राम पंचायत ला औषधि व सैनिटाइजर चा पुरवठा करण्यात आला. शिंदे परिवाराने विविध उपक्रम हाती घेतले मग ते कोविड सेंटर सुरु करणे असो, मोफत आरोग्य सेवा पुरवणे असो, किंवा प्राणवायू पुरवठा करणारया यंत्राची उपलब्धता करून देणे असो… या सोबतच विविध ग्रामपंचायती ला औषधे व इतर साहित्य पुरविणे या सारखी लोकोपयोगी कामे हाती घेतली. या साठी भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.