Home Breaking News दुर्दैवी घटना :- दारूच्या नशेत पतीने मध्यरात्रीचा वेळेस केला पत्नीचा खून.

दुर्दैवी घटना :- दारूच्या नशेत पतीने मध्यरात्रीचा वेळेस केला पत्नीचा खून.

 

खून केल्यानंतर स्वतः पोलीस स्टेशन मधे जाऊन केली गुन्ह्यांची कबुली.

न्यूज नेटवर्क:-

पती पत्नीच्या झगडयांची परिणीता कधी खून करण्यात होईल हे कधीही सांगता येत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आरोग्य कॉलनीत राहणाऱ्या अशाच पती पत्नीच्या झगडयांत पतीने उशीनं तोंड दाबून आपल्या पत्नीची हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीनं मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. तसेच मृत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी समोसा उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेगाव परिसरात निर्घृण हत्येची ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी 28 वर्षीय पतीचं नाव शिवाजी कैलास आढाव असू तो मुळचा संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथील रहिवासी आहे. आरोपी आढाव गेल्या काही दिवसांपासून आपली पत्नी संजीवनी (वय- 22) हिच्यासोबत शेगाव येथील आरोग्य कॉलनीत भाड्यानं खोली घेऊन राहत होता.

आरोपी पती आणि मृत पत्नी संजीवनी यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादविवाद होत असायचा. कालही पती पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपी पतीनं रागाच्या भरात पत्नी संजीवनी हिच्या तोंडावर उशीनं दाबून तिची निर्घृण हत्या केली.

मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीनं हत्या केल्यानंतर स्वत: शहर पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला पतीला ताब्यात घेवून पुढील तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सईबाई मोटे सामान्य रूग्णालयात पाठवला आहे. त्याचबरोबर घटनेची माहिती मृत महिलेच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

शहर पोलिसांनी रात्री अडीचच्या सुमारास मृत महिलेच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर माहेराकडील नातेवाईक त्वरित रूग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी सांगितलं की, आरोपी आणि त्यांची मुलगी संजीवनी यांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र आरोपीला दारुचं व्यसन असल्यानं तो मृत मुलीला नेहमी त्रास देऊन मारहाण करायचा.

याबाबत याआधीही पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी आपसात समेट घडवून आणल्यानंतर त्यांचा संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत झाला होता. पण काल अचानक आरोपीनं रागाच्या भरात पत्नीची हत्या केली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.

Previous articleधक्कादायक :-माणिक कळसकर यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला?
Next articleस्तुत्य उपक्रम :- शिंदे परिवाराकडून ग्रामीण क्षेत्रात पण आरोग्य साहित्य वाटप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here