Home चंद्रपूर कॅन्सरग्रस्त रुग्णाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मदतीचा हात.

कॅन्सरग्रस्त रुग्णाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मदतीचा हात.

 

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या परिवाराने मानले बैंक अध्यक्षासह संचालकांचे आभार.

चंद्रपुर (प्रतिनिधी) :-

दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘शेतकरी कल्याण निधी’ या योजनेअंतर्गत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांचे हस्ते व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, मुख्याधिकारी कल्याणकर, अविनाश लांजेवार,सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत आज (दि.31) ला स्थानिक बगडखिडकी येथील रहिवासी सुहास पानबुडे या कॅन्सरग्रस्त रुग्णाला ४०,००० रुपयांचा धनादेश मदतनिधी म्हणुन देण्यात आला. सदर मदतनिधी रुग्णाच्या पत्नी सौ. पुष्पा सुहास पानबुडे यांना सुपूर्द करण्यात आला.
दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कॅन्सरग्रस्त रूग्ण, शेतकरी, शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून जिल्हा बँकेतर्फे सामाजिक बांधीलकी जोपासल्या जात आहे.
यावेळी संपन्न छोटेखानी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी बैंकेच्या विविध कल्याणकारी योजनेवर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रूग्णांनी बैंकेसोबत संपर्क करुन आर्थीक मदत घ्यावी, असे आवाहन केले. या शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी असे आवाहन बैंकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी केले आहे.

Previous articleदिलासादायक:- अखेर कोरोना ला हरविण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधला नवा उपाय.
Next articleखळबळजनक :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या पदाधिकारी यांच्यावर गोळीबार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here