Home क्राईम स्टोरी खळबळजनक :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या पदाधिकारी यांच्यावर गोळीबार?

खळबळजनक :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या पदाधिकारी यांच्यावर गोळीबार?

 

या घटनेमुळे बारामती हादरली राष्ट्रवादी चे युवा नेते रविराज तावरे गंभीर जखमी.

क्राईम न्यूज :-

बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर आज (31 मे) संध्याकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून या गोळीबारात तावरे यांच्या पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे. रविराज तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तसेच ते जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. माळेगावातील एक मोठी प्रस्थ म्हणून त्यांची ओळख आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे अचानक गोळीबार झाल्याने बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Previous articleकॅन्सरग्रस्त रुग्णाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मदतीचा हात.
Next articleधक्कादायक :- शेतकरी अमोल देवतळे यांची फाशी घेऊन आत्महत्त्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here