Home वरोरा धक्कादायक :- शेतकरी अमोल देवतळे यांची फाशी घेऊन आत्महत्त्या.

धक्कादायक :- शेतकरी अमोल देवतळे यांची फाशी घेऊन आत्महत्त्या.

 

स्वताच्या शेतात आंब्याच्या झाडाला लटकून फाशी.

वरोरा प्रतिनिधी किशोर डुकरे :-

वरोरा तालुक्यातून जवळपास 15 किलोमीटर दूर असलेल्या बोरगाव देशपांडे येथे अमोल देवतळे वय 33 वर्ष या शेतकऱ्यांनी स्वताच्या शेतात जावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 3 च्या दरम्यान घडली.

अमोल देवतळे या शेतकऱ्यांनी काय म्हणून फाशी घेतली याचे कारण अजून गूलदस्त्यात असून त्याचे मागे पत्नी आई दोन मुले असा आप्त परिवार आहे. फाशी घेतल्यानंतर गावातील काही व्यक्तींना ही माहिती मिळताच शेतात धाव घेतली या संदर्भात शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी चौकशीकरिता घटनास्थळी पोलीस चमू पाठवली असून पोलीस तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here