Home वरोरा इम्तियाज जलील व रामदास तडस या खासदारांवर गुन्हा दाखल मग नगराध्यक्ष अली...

इम्तियाज जलील व रामदास तडस या खासदारांवर गुन्हा दाखल मग नगराध्यक्ष अली प्रशासनाचे जावई आहेत का?

 

मनसेचे वैभव डहाने यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणी नंतर प्रशासनाचे वेट अँड वॉच कशामुळे?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा नगरपरिषदचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी कोरोना लॉक डाऊन च्या काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा हातात घेत आपल्या समर्थकांसह वरोरा येथील गांधी चौकातील काही दुकानाला प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सील लावल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांना धमकावून सील तोडायला लावले होते याचे सबळ पुरावे असतांना आणि नगरपरिषद कर्मचारी यांची तक्रार असतांना शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी रीतसर स्थानिक प्रशासनाला लेखी तक्रार करून सुद्धा अहेतेशाम अली यांच्यावर गुन्हे दाखल का करण्यात आले नाही ही आश्चर्याची बाब आहे.

एकीकडे कोरोना काळात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकारणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी (1 जून) कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.दुसरीकडे वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला.

खरं तर औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्याचे कारण आणि नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी केलेले उपद्व्याप हे सारखेच असताना एका खासदारांवर गुन्हा दाखल होतो मात्र त्यापेक्षा पदाने लहान असलेल्या नगराध्यक्ष अहेतेशाम अली गुन्हा दाखल होत नाही तर मग त्या दोन खासदारांपेक्षा नगराध्यक्ष अली हे कायद्यापुढे मोठे झाले का? की ते प्रशासनाचे जावई आहे ? की आणखी यामागे मोठे कारण आहे हे समजायला मार्ग नसून या संदर्भात प्रशासनाचे “वेट अँड वॉच” कशासाठी असा सवाल आता सर्वसामान्य जनता करीत आहे.

Previous articleप्रहार सेवक किशोर डुकरे यांच्या प्रयत्नाने दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले टान्सफार्म.
Next articleपोलीस पंचनामा :- शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here