Home राष्ट्रीय खळबळजनक :- कोरोनाची तिसरी लाट येणार भयंकर, एका दिवशी येणार एवढे रुग्ण?

खळबळजनक :- कोरोनाची तिसरी लाट येणार भयंकर, एका दिवशी येणार एवढे रुग्ण?

 

देशात १५ जुलैला होणार संपूर्ण अनलॉक, पण काळजी घेणे गरजेचे.

कोरोना अपडेट :-

आता कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी तिसऱ्या लाटेचं संकट समोर आहे. त्यामुळे सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत दिवसाला जवळपास 3 लाख नव्या रूग्णांची नोंद होत होती. पण तिसऱ्या लाटेत मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होवू शकते. तिसऱ्या लाटेत दिवसाला 5 लाखांपर्यंत नव्या रूग्णांची नोंद होईल अशी शक्यता आयआयटी कानपूरकडून वर्तवण्यात आली आहे.

रिपोर्टमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आल्यासमोर.

भारतात 15 जुलैपर्यंत संपूर्ण पूर्ण अनलॉक प्रक्रिया सुरू होईल. मात्र पहिल्या लाटेनंतर आलेला दिवस पुन्हा येईल. जानेवारी महिन्यात अनलॉक झालं होतं. पण आता अनलॉकनंतर नागरिकांनी खबरदारी बाळगली नाही तर परिस्थिती अत्यंत भयावह होईल असं देखील सांगितलं जात आहे. सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर केला नाही तर कोरोनाती तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत येवू शकते.

आयआयटी कानपूरच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबरमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी लाट बदलत्या म्यूटेंटसोबत आली आणि खबरदारी बाळगली नाही, तर सप्टेंबर महिन्यात लाट तिव्र होवू शकते. पण जर लोक नियमांचं पालन करतील मास्क लावतील, लस घेतील तर नोव्हेंबर महिन्यात तिसरी लाट येवू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here