Home चंद्रपूर पोलीस पंचनामा :- पोलीस नाईक उमेश पोटावी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली...

पोलीस पंचनामा :- पोलीस नाईक उमेश पोटावी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली लाच घेतांना अटक.

 

सट्टापट्टी चालवीत असणाऱ्या एका युवकांच्या तक्रारीवरून कारवाई.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

दारूबंदी उठल्यानंतर आता सट्टा पट्टी हा धंदा डोकं वर काढत असून सट्टापट्टी घेणाऱ्या एका युवकास सतत लाच मागुन त्रास देणाऱ्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 15 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक उमेश गोपाळा पोटावी, ब.नं. 2451 हा चंद्रपूर येथिल एका युवकाला सट्टा चालवत असल्याच्या कारणावरून वारंवार लाचेची मागणी करत होता. ह्यापूर्वी चंद्रपूर येथिल इंदिरा नगर भागात राहणाऱ्या एका 28 वर्षीय युवकास पाथरी येथे सट्टापट्टी घेताना सदर पोलीस शिपायाने पकडले होते मात्र त्यावेळी त्याने युवकाकडुन 20 हजार रुपयांची लाच घेऊन सोडून दिले होते.
मात्र त्यानंतरही पोलीस नाईक उमेश गोपाळा पोटावी हा तक्रारदार युवकास फोन करून वारंवार 20 हजार रूपयांची लाच मागुन त्रास देत होता. पोलीस नाईक उमेश पोटावी ह्याच्या त्रासाला कंटाळून व लाच द्यायची इच्छा नसल्याने सदर युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. मिळालेल्या तक्रारीनुसार विभागाने सापळा रचला व त्यानुसार तडजोड करून 15 हजाराची लाच घेण्यास पोलीस नाईक पोटावी तयार झाला.

दिनांक 14 जुलै 2021 रोजी पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, ला. प्र. वि. नागपूर व मिलिंद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर ह्यांच्या कुशल मार्गदर्शनात अविनाश भामरे पोलीस उपअधीक्षक, पोह. मनोहर एकोणकर, नापोशि अजय बागेसर, पोशि नरेश ननावरे, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, चालक पोशी.सतिश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर ह्यांच्या चमूने पोलीस नाईक उमेश गोपाळा पोटावी ह्याला पंचासमक्ष 15 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली असुन पुढील कारवाई सुरू आहे.

Previous articleधक्कादायक :- राजू कुकडे विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा, अन्यथा रेती साठे होणार जप्त?
Next articleमूल तहसीलदार होळी यांच्या रेती घाट व रेती चोरी संदर्भातील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here