Home चंद्रपूर धक्कादायक :- राजू कुकडे विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा, अन्यथा रेती साठे...

धक्कादायक :- राजू कुकडे विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा, अन्यथा रेती साठे होणार जप्त?

 

हुकुमशहा तहसीलदार होळी यांनी काढला रेती घाट व्यावसायिकांसाठी आदेश?

रेती चोरी प्रकरण भाग – ८

मूल तहसीलदार होळी यांनी स्वतःचा भ्रष्टचार लपविण्यासाठी पदाचा दुरुपयोग करून अगोदर मूल येथील निवेदन करणाऱ्या युवकांना बेकायदेशीर नोटीस दिला व त्यांचे मनौधर्य खचवले तर दुसरीकडे रेती चोरी प्रकरणी बातम्याची मालिका भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर सुरू असल्याने भांबावलेल्या तहसीलदार होळी यांनी आपल्या आदिवासी समाजाचा वापर करून संपादक राजू कुकडे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करायला लावून व आपल्या काही नतभ्रष्ट समर्थकांना सांगून एका पोर्टल वर बातमी प्रकाशित केली. परंतु त्यामुळे बातम्यांची मालिका थांबत नाही म्हणून त्यांनी संपादक राजू कुकडे यांना दहा लाख अब्रू नुकसानीचा दावा केला त्यामुळे सुद्धा काही फरक पडणार नाही असे लक्षात आल्यामुळे आता चक्क रेती घाट व्यावसायिकांना आदेश दिला की तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे राजू कुकडे यांच्या विरोधात तक्रार करा किंव्हा गुंड पाठवून त्याला मारा अन्यथा मी तूम्हच्या रेती साठ्यावर कारवाई करणार.

आपली भ्रष्टाचारी व्रुत्तीची पोल खुलू नये यासाठी तहसीलदार होळी हे कायदा हातात घेऊन ज्या प्रकारे लोकशाही पद्धतीने विरोध करणाऱ्यांना हुकूमशाही पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे, ती बाब प्रशासन स्तरावर कायदा सुव्यवस्था भंग करणारी असून असा उर्मट अधिकारी एका तालुक्याचा दंडाधिकारी म्हणून काम करतोय तर त्या तालुक्यातील जनतेला ते काय न्याय देत असतील का? याबद्दल शंकेला वाव आहे.

जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार होळी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये?

आरक्षणांने एका अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर एका जातीचा व्यक्ती बसला असला तरी तो खुर्चीवर बसल्यावर जातीचा नसतो तर भारतीय राज्य घटनेनुसार तो सर्व जाती धर्म यांच्या हिताचे रक्षण करणारा असतो तर मग तहसीलदार होळी यांनी जातीच्या लोकांना समोर आणून जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला का लावले? मूल येथील युवकांनी चिंचाळा येथील जप्त रेती साठा चोरीस गेल्यामुळे तहसीलदार यांना निवेदन देऊन रेती चोरट्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यांच्यावरच कारवाई करण्यासाठी तहसीलदार होळी यांनी नोटीस पाठवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी का दिली? आणि आता तर चक्क रेती घाट व्यावसायिकांना आदेश देऊन सांगितल्या गेले की संपादक राजू कुकडे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा किव्हा त्याला मारहाण करा अन्यथा मी तूम्हच्या रेती साठ्यावर कारवाई करतो, म्हणजे तहसीलदार होळी हे एक हुकुमशहा सारखे वागत असून त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि म्हणून तहसीलदार होळी यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here