Home वरोरा प्रहार संघटनेचे किशोर डुकरे यांच्या नेत्रूत्वात अनोखे आंदोलन.

प्रहार संघटनेचे किशोर डुकरे यांच्या नेत्रूत्वात अनोखे आंदोलन.

 

६ किमी च्या रस्त्यांवरील खड्ड्यात लावली बेशरमाची झाडे.

वरोरा प्रतिनिधी :-

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेत्रूत्वात आतापर्यंत झालेले विविध आंदोलन लक्षवेधक ठरले आहे त्याच धर्तीवर वरोरा तालुक्यातील प्रहार सेवक किशोर डुकरे यांच्या नेत्रूत्वात होणारे आंदोलन सुद्धा लक्षवेधक ठरत आहे. ग्रामीण जनतेच्या समस्या त्यातही शेतकऱ्यांच्या समस्या आगळे वेगळे आंदोलन करून लीलया सोडवनारे किशोर डुकरे यांनी नुकतेच तब्बल ६ किलोमीटरच्या आटमृडी ते कोंढाळा या रस्त्यांवर बेशरम ची झाडे लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

आटमृडी ते कोंढाळा या मार्गाची दैयनीय अवस्था झाली आहे. या संदर्भात गट ग्राम पंचायत आटमृडी यांनी ग्रामसभेचा ठराव पाठवून रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याची विनंती केली पंचायत समिती व बांधकाम विभागाला केली होती परंतु आज या ठरावाला दोन वर्ष पूर्ण होऊन सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या मुजोर धोरणाचा निषेध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या माध्यमातून काल दिनांक २६ जुलै ला सकाळी ११.०० वाजेपासून तब्बल ६ किमी च्या रस्त्यांवर बेशरम ची झाडे लावून निषेध करण्यात आला.

गट ग्रामपंचायत आटमृडी घेतली ताब्यात?

गट ग्राम पंचायत आटमृडी येथील सचिव यांच्या सतत गैहजर यामुळे तेथील जनता त्रस्त झाली होती त्यामुळे नाईलाजाने त्यांचा निषेध करण्यासाठी ग्राम पंचायत ताब्यात घेऊन सचिवांचा जाहीर निषेध केला यावेळी प्रहार तालुका अध्यक्ष किशोर डुकरे, सरपंच, विठ्ठल जोगी, उप सरपंच जयदेव लभाणे तसेच गावकरी हजर होते

Previous articleशेती वार्ता :- सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नवी हरितक्रांती निर्माण होऊ शकते.
Next articleग्रामपंचायत आटमुर्डीचे सचिव खानेकर यांचेवर आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी कारवाई करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here