Home वरोरा ग्रामपंचायत आटमुर्डीचे सचिव खानेकर यांचेवर आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी कारवाई करा.

ग्रामपंचायत आटमुर्डीचे सचिव खानेकर यांचेवर आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी कारवाई करा.

सवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे सरपंच उपसरपंच यांची तक्रार.

वरोरा प्रतिनिधी :-

पंचायत समिती वरोरा अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामपंचायत आटमुर्डीचे सचिव जी. एन. खानेकर यांचेवर आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही करून ग्राम पंचायत आटमुर्डीचा कार्यभार तत्काळ काढावा अशी मागणी गावाचे सरपंच उपसरपंच यांनी सवंर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

संवर्ग विकास अधिकारी याना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की पंचायत समित वरोरा अंतर्गत ग्राम पंचायत आटमुर्डी येथील ग्रामसेवक जी. एन. खानेकर यांनी ग्राम पंचायत आटमुर्डी येथील कमेटीला विश्वासात न घेता परस्पर आर्थिक गैरव्यवहार केला आहे, त्यांनी केंद्र तथा महाराष्ट्र शासनाचे कामकाजात आजपर्यंत सहभाग घेतला नाही. ग्राम पंचायत आटमुर्डी येथील केंद्र सरकार तथा राज्य सरकार याचे कडून येणारे अनुदान तथा निधी विकास कामात वारंवार अडचण किंवा अडसर निर्माण करीत असतात. मौजा आटमुर्डी येथील दलित वस्थिमध्ये जामणी (बु) येथून मिळणारे नळ योजनेच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत असल्याबाबतच्या गावकऱ्यांच्या गंभीर तक्रारी आहेत. ग्राम पंचायत आटमुर्डी येथील खरेदी करताना उदा मास्क, सानिटायझर फवारणीचे साहित्य इत्यादी स्वमर्जीने, मनमर्जीने अधिकचे बिले लावून आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहेत.
ग्राम पंचायत आटमुर्डी येथील सरपंच तथा उपसरपंच व सन्माननीय सदस्या (महिला) यांना उद्घट असभ्य वर्तणूक, वागणूक देत असल्याने सवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा तथा पंचायत विस्तार अधिकारी वरोरा यांना मौखिक तथा लेखी निवेदन देवून सुद्धा कार्यवाही केल्या जात नाही.
आणि म्हणून सदर ग्रामसेवकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे संदर्भात कायदेशीर कार्यवाही करून त्याचा तत्काळ ग्राम पंचायत आटमुडी चा प्रभार काढून घेण्यात यावा अशी मागणी सरपंच उपसरपंच तथा सदस्यांनी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

सवंर्ग विकास अधिकाऱ्यांनी केले जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

ग्रामपंचायत आटमुर्डीचा कार्यभार ग्राम सचिव खानेकर हे लोकशाही पद्धतीने बघत नसून स्वमर्जीने बघतात पर्यायाने गावाचा विकास झाला नाही. शासनाकडून आलेल्या निधीचा योग्य विनियोग न करता त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला गेला परंतु ही बाब सवंर्ग विकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर शुद्धा जर संवर्ग विकास अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सचिववर कायदेशीर कारवाई करत नसेल तर त्यांना वाचविण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे जर येत्या दहा दिवसात सचिव खानेकर यांच्यावर कारवाई करून त्यांची उचलबांगडी केली नाही तर पंचायत समिती कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करू असा इशारा उपसरपंच यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here