Home महाराष्ट्र दुःखद:- महाराष्ट्राच्या राजकारणातील “भिष्म पितामह”आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

दुःखद:- महाराष्ट्राच्या राजकारणातील “भिष्म पितामह”आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

 

गणपतराव म्हणजे राज्याच्या राजकारणातील “विद्यापीठच” मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया.

वेब न्यूज वार्ता :-

विधानसभेचे सर्वात जास्त वर्षे सदस्य राहिलेले माजी मंत्री व आमदार गणपतराव देशमुख म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे “भिष्म पितामह”. त्यांच्याकडे बघून अनेक जण विधानसभेतील कामकाज शिकले. मला 20 वर्षे सदनात व सदनाबाहेर तर कायमच त्यांचे मार्गदर्शन लाभले. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण सदनात मला त्यांच्या बरोबर एकाच बेंच वर बसून काम करता आले अशी प्रतिक्रिया देत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आपल्या शोकसवेंदना व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले की सर्व प्रकारच्या आयुधांचा वापर करून सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून जनतेचे काम कसे करून घ्यायचे हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो.
“साधी राहणी उच्च विचारसरणी” हे जणू गणपत रावांसाठीच लिहिले गेले असावे. अगदी शेवट पर्यंत बस प्रवास करणारे आमदार म्हणून ते पूर्ण राज्याला परिचित होते. जनतेच्या सेवेसाठी वाहिलेला लोकप्रतिनिधी कसा असावा याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख.

देशात “11 टर्म” विधानसभा जिंकण्याचा विक्रम.

गणपतराव देशमुख यांनी राजकारणातील अनेक पिढ्या पाहिल्या, घडविल्या असे गणपतराव म्हणजे राज्याच्या राजकारणातील “विद्यापीठच”. देशात “11 टर्म” विधानसभा जिंकण्याचा विक्रम गणपत रावांच्याच नावावर आहे. या मोठ्या कारकिर्दीत कितीही अडचणी आल्या तरी ते कायम शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या जाण्याने राजकारणातील एक अध्याय समाप्त झाला आहे व आज महाराष्ट्राने एक आदर्श व निष्ठावंत राजकारणी गमावला आहे. अशा बहुआयामी नेत्रूत्वाला आपणा सर्वांतर्फे गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो अशा शोकसवेंदना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here