Home ब्रम्हपुरी परवानाधारक मद्यविक्रेत्यांना मिळणारी “विशेष सवलत” थांबणार का…?

परवानाधारक मद्यविक्रेत्यांना मिळणारी “विशेष सवलत” थांबणार का…?

 

मद्यविक्रेत्यांना “अर्थपूर्ण” व्यवहाराने खुली सूट असल्याची शहरात चर्चा.

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठली असली तरी अवैद्य दारूविक्री मध्ये गुंतलेले काही अवैद्य दारुव्यावसायिक अजुनही आपला धंदा सोडायला तयार नाही व त्यांना
ब्रम्हपुरी शहरातील परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून सरसकट स्टॉक उपलब्ध होतं असल्याने अवैद्य दारुविक्रेते मोठ्या थाटात खुलेआम दारूविक्री करतांना दिसत आहेत.
या अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करून सामाजिक सौर्हाद्य अबाधित ठेवावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 ला दारुबंदी झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात अवैद्य दारुविक्री व वाहतूक करणारे अनेक माफीया उदयास आले. अनेकांनी या व्यवसायातुन अमाप पैसा गोळा केला . आता यावर्षी दारुबंदी उठली मात्र अवैद्य दारुविक्री करणारे व्यावसायिक ग्रामीण भागात ज्या ठिकाणी परवाना धारक दुकाने नाहीत त्या ठिकाणी आपले जाळे पसरवत आहेत व परवाना असलेल्या दारूदुकान मधून खुलेआम दारू खरेदी करीत आहेत. छोट्या-मोठ्या वाहणाने होणारी ही तस्करी वेळी-अवेळी केव्हाही बिनधास्त होतं असल्याने कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने व्यवसायिकांना वेळेचे घालून दिलेले बंधन बघता परवानाधारक मद्यविक्रेत्यांना मिळणारी “विशेष सवलत”कुठल्या नियमावलीने आहे हे मात्र एक कोडं आहे. तर अर्थपूर्ण व्यवहाराने संबंधित विभाग यांना “विशेष सवलत”देत असल्याच्या चर्चेला नागरिकांकडून शहरात चर्चीले जात असल्याने संबंधित विभाग अशा अवैध कृत्यावर काय कारवाई करणार हे पाहणे आता उल्लेखनीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here