Home महाराष्ट्र खळबळजनक :- आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालकांची कर्मचारी भरतीसाठी मुजोरी

खळबळजनक :- आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालकांची कर्मचारी भरतीसाठी मुजोरी

 

मुद्दत संपलेल्या व भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या संचालक मंडळावर कारवाई होणार का?

या निर्णयाने संस्थेवर 25 ते 30 लाखांचा लागणार भुर्दंड. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक लाभांशवर होणार परिणाम.

भद्रावती प्रतिनिधी :-

आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नोंदणी क्रमांक 131 च्या सर्व भागदारक व सभासदांना अंधारात ठेवून संचालक मंडळाच्या पदाधिकारी यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा संस्थेच्या 27.03.2021 ला सर्वसाधारण सभेतील संस्थेत नवीन 6 पदांची नोकरभरती न करणे व स्टॅपिंग पॅटर्न मंजुर न करण्याबाबत सर्वसाधारण सभासदांनी विरोध करून सुद्धा दि.13.07.2021 ला संचालक मंडळाकडून सहाय्यक निबंधक भद्रावती यांना स्टॅपिंग पॅटर्न मंजूर करून नवीन 6 पदांची नोकर भरती ची परवानगी साठी पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अगोदरच संचालक मंडळावर पैशाची अफरातफर केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक व तालुका सहाय्यक निबंधक यांच्यासह सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रारी संस्थेच्या काही सदस्यांनी केल्या असताना संचालक मंडळाकडून संस्थे मध्ये गरज नसतांना सुध्दा विनाकारण स्वहितासाठी नवीन 6 पदांची नोकर भरती करण्यासाठी मासिक सभा दि.11.07.17 ठराव क्र.13, दि.11.02.18 ठराव क्र.13, दि.07.05.19 ठराव क्र.8, दि.06.07.19 ठराव क्र.10 नुसार ठराव घेतले, त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा सन 2019-2020 दि.27.03.2021 ला सर्वसाधारण सभेतील संस्थेत नवीन 6 पदांची नोकरभरती न करणे व स्टॅपिंग पॅटर्न मंजुर न करण्याबाबत सर्वसाधारण सभासदांनी विरोध केल होता. दि.13.07.2021 ला संचालक मंडळाकडून सहाय्यक निबंधक भद्रावती यांना स्टॅपिंग पॅटर्न मंजूर करून नवीन 6 पदांची नोकर भरती ची परवानगी साठी पत्र दिले.परंतु संस्थेच्या हितचिंतक भागदारक सभासदांनी संस्थेच्या हिताच्या दृष्टीने संचालक मंडळाकडून विनाकारण गरज नसतांना 6 पदांची नोकर भरती प्रक्रिया करीत असल्याने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे, मा. विभागीय सहनिबंधक, नागपूर विभाग, सहकारी संस्था नागपूर,मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था चंद्रपूर, यांच्याशी पत्राचार केला तसेच विभागीय सहनिबंधक, नागपूर विभाग, नागपूर यांचेशी संस्थेच्या आजच्या परिस्थिती बद्दल सविस्तर चर्चा केली. व त्यांना पटवून दिले की संस्थेमध्ये आजच्या घडीला सभासद संख्या 2710 आहे, संस्थेचा संपूर्ण कारभार संगणिकृत आहे. त्यामुळे संस्थेत आजच्या घडीला 9 कर्मचारी कार्यरत असल्यामुळे व त्यांच्यावर कामाचा कुठल्याही प्रकारचा बोझा नसल्याने तसेच आर्थिक पत्रक 2019-20 नुसार 9 कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते 42,77,592 रुपये दिले आहे आणि संचालक मंडळाने नवीन 6 पदांची भरती घेतल्यास अजून 25 ते 30 लाख रुपये कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अधिकचे द्यावे लागतील.त्यामुळे जवळपास 70 ते 75 लाखापर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यावर खर्च होईल. सर्वसाधारण सभासदांच्या लाभांश वर यामुळे फरक पडेल. तसेच संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ दि.24.04.2020 ला संपलेला आहे,

सद्यस्थितीत कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ दिली आहे,त्यामुळे सद्यस्थितीत नोकर भरती घेणे संस्थेच्या हिताचे होणार नाही हे विभागीय सहनिबंधक नागपूर यांना
पटवून दिले. या संदर्भात सहकार आयुक्त व निबंधक पुणे व विभागीय सहनिबंधक नागपूर विभाग, नागपूर यांनी भागदारक सभासदांच्या पत्राचा गांभीर्याने विचार करून सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था भद्रावती,यांना सभासदाच्या तक्रारीतील मुद्द्यांचे अनुषंगाने चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी असे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक निबंधक भद्रावती यांचेकडून संस्थेच्या स्टॅपिंग पॅटर्न मंजुरी व नविन 6 पदांची नोकरभरती बद्दल चौकशी करून दि.27.07.2021 ला संस्थेत नवीन कर्मचारी भरतीची कोणतीही आवश्यकता नाही आहे असे या कार्यालयाचे मत आहे व भविष्यात विद्यमान संचालक मंडळाकडून नविन कर्मचारी नियुक्ती साठी कोणतीही कार्यवाही/ प्रक्रिया करण्यात येवू नये,असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. सहाय्यक निबंधक यांच्या या आदेशामुळे विद्यमान संचालक मंडळाला जबरदस्त हादरा बसला आहे जे की स्वहितासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभासदांचा विरोध असून सुद्धा जबरदस्तीने नविन 6 पदांची नोकरभरती करण्यात मग्न होते. या आदेशामुळे संस्थेचे मोठया प्रमाणात होणारे नुकसान टळले व भविष्यात सर्वसाधारण सभासदांचा आर्थिक फायदा होणार हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here