Home भद्रावती इशारा :- स्थानान्तरीत देशी दारू दुकान बंद करण्यासाठी नागरिक आक्रमक

इशारा :- स्थानान्तरीत देशी दारू दुकान बंद करण्यासाठी नागरिक आक्रमक

 

आशा किशोर रत्नपारखी व ईतर यांच्या मालकीचे देशी दारू दुकानाचे स्थानांतरण रद्द करा.

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :-

क्रांतीवीर भगतसिंग पुतळा, वीवेकानंद रुग्णालय व वंशिका टेक्नीकल इन्स्टीट्यूट या नावाचे महाराष्ट्र शासनचे अधिकृत महिला प्रशिक्षण केंद्र,अशा रहवास व वर्दळीच्या ठिकाणालगत नव्याने स्थानान्तरीत झालेले आशा किशोर रत्नपारखी व ईतर यांच्या मालकीचे देशी दारू दुकानाचे स्थानान्तरनं रद्द करण्यात यावे या मागणी साठी अंदाजे पाचशे ते सहाशे नागरिक, महिला-पुरुषांनी स्वतः देशी दारू दुकान बंद करत पोलिस ठाण्यात मोर्चा नेऊन देशी दारू दुकान इतरत्र स्थानांतरन करावे अशी मागणी पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव यांच्या कडे केली आहे.

शहीद भगतसिंग चौक येथे पुल्लू्रवार यांना ग. क्र.542 मध्ये निवासाचे प्रयोजनाकरिता तत्कालीन मा. नायब तहसीलदार यांच्या मार्फत जागेचा पट्टा देण्यात आला होता अशा अतिक्रमित जागेवर आशा किशोर रत्नपारखी व ईतर यांनी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडून CL-3 अनुज्ञप्ती मंजूर करून घेत मद्यसाठा सुद्धा उपलब्ध केलेला आहे, या अगोदर इथे कुठलेही वैध व अवैध दारू विक्री होतं नसून 60 फूट अंतरावर शहीद भगतसिंग पुतळा, 50 फूट अंतरावर वंशिका टेक्निकल इन्स्टिटयूट नावाचे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत महिला प्रशिक्षण केंद्र, विवेकानंद रुग्णालय, रेल्वे स्टेशनं परिसर आणी संपूर्ण क्षेत्र निवासी व कृषी उद्योगाचे असल्याने स्थानिक व शहरातील ईतर नागरिक आक्रमक होतं स्थानान्तरीत देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणी साठी पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे अंदाजे पाचशे ते सहाशे लोक एकत्र येऊन ठाणेदार रोशन यादव यांना निवेदन दिले व जिल्हा उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सुद्धा निवेदन दिले. निवेदन देतांना नगर सेवक महेश भर्रे, माजी नगरसेवक बंटी श्रीवास्तव, अविनाश राऊत, ओमप्रकाश बगमारे,विष्णू तोंडरे,विनोद झोडगे, सूरज शेंडे, व वार्डातील महिला, पुरुष व विदयार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here