Home Breaking News त्या फ्राय चिकन चोरणाऱ्या पत्रकाराला मिळाली फ्राईड थापड?

त्या फ्राय चिकन चोरणाऱ्या पत्रकाराला मिळाली फ्राईड थापड?

 

एका वाईन बार हॉटेल मधे घडलेल्या या रंगतदार घटनेची सर्वत्र चर्चा?

चंद्रपुर प्रतिनिधी :-

चंद्रपुरातील दारू बंदी उठली आणि मद्यप्रेमींची वाइन बार मधे जणू जत्रा भरली पण त्या जत्रेत चक्क एका मद्यधुंद पत्रकाराने दुसऱ्याच्या टेबल वरील फ्रॉय चिकन वर ताव मारला आणि मग त्या पत्रकाराच्या कानशीलात बसली असता सोबत असलेल्या दुसऱ्या नामांकित पत्रकाराने तिथून धूम ठोकली असल्याचा धक्कादायक प्रकार तेथील वेटरने पाहिला आणि ही वार्ता संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत पोहचली पण ते पत्रकार कोण? हे मात्र अजूनही गूलदस्त्यात असून त्या हॉटेल मधे एकाने त्या घटनेचा फोटो काढला असल्याची चर्चा असल्याने आता हा मामला सार्वजनिक होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना काळातील शासनाच्या नियमावली नुसार फक्त ४ वाजेपर्यंतच वाइन बारची परवानगी आहे आणि त्यानंतर ८ वाजेपर्यंत फक्त पार्सल सुविधा सुरू असते मात्र हॉटेल मालकांचे काही व्यावसायिक, नौकरीदार तसेच काही पत्रकार यांच्यासोबत असलेले हितसंबंध बघता हे वाईन बार हॉटेल सायंकाळी उशिरा ८ वाजेपर्यंत सुरू असते. याचाच फायदा घेत दोन दिवसापूर्वी चंद्रपूर शहरातील एका हॉटेल मधे एका मद्यधुंद पत्रकारांनी दुसऱ्याच्या टेबल वरील फ्रॉय चिकन वर ताव मारल्याने फ्राईड थापड खावी लागली असल्याने पत्रकारिता क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

सीसीटीवी फुटेज घेतले तर होईल खुलासा.

हॉटेल मधे घडलेला हा हाणामारीचा हा प्रकार सीसीटीवी फुटेज मधे आला असून या संदर्भात जर सीसीटीवीफुटेज तपासले गेले तर ते पत्रकार नेमके कोण होते? याचा शोध लागू शकतो मात्र या घडलेल्या प्रकारची जोरदार चर्चा शहरात सुरू असल्याने काही पत्रकारांच्या भुवया उँचलवल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here