Home वरोरा कोरोनाने मृत झालेल्या गरीब पालकांच्या पाल्यांचा व गरीबांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च ट्रस्ट...

कोरोनाने मृत झालेल्या गरीब पालकांच्या पाल्यांचा व गरीबांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च ट्रस्ट उचलेल : रवि शिंदे

 

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल व रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारा वरोरा तालुक्यात कोरोना जनजागृती कार्यक्रम संपन्न.

वरोरा प्रतिनिधी :

कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेदरम्यान ज्या गरीब पालकांचा मृत्यू झाला त्यांची पाल्य व ग्रामीण क्षेत्रातील अत्यंत गरीब शेतकरी, मजुर कुटूंबातील मुलामुलींच्या लग्नाचा खर्च स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारा भविष्यात करण्यात येइल अशी ग्वाही वरोरा तालुक्यात कोरोना जनजागृती करतांना रवि शिंदे यांनी दिली.
भद्रावती शहरात डेल्टा प्लसचा रूग्ण आढळून आल्याने व संभाव्य तिस-या लाटेची शक्यता बघता गावोगावी कोरोना जनजागृती व्हावी, कोरोनामुक्त गाव संकल्पना राबविल्या जावी करीता आज (दि.१३) ला वरोरा तालुक्यातील खांबाळा सर्कल मधील लोणार, पांढरतळा आदी गावात दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांनी स्वत: जावून जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर, दत्ताभाऊ बोरेकर, सुरज निब्रड, श्रीकृष्ण धवने, अशोक कातकडे, सरपंच शंकरराव दडमल, माजी सरपंच सुधाकर ठाकरे, देविदास उपरे, राजेंद्र सरपाते, ग्रा.पं. सदस्य वैशाली हिरादेवे, सिंधू दडमल, माजी सरपंच मनिषा काकडे, मंथना पिंपळकर, आदी उपस्थित होते.
कोरोनाने अनेकांच्या घरचे आधार हिरावले. अनेक मुलं-मुली अनाथ झाले. अनेकांना आधार राहीला नाही. होता नव्हता पैसा उपचारात गेला, रोजगार हिरावला, लॉकडाउन ने कृषीअर्थव्यवस्थेचाही कणा मोडला अशा परीस्थितीत गरजु व गरीबांना समाजाकडून मदतीचा हात हवा आहे. तो हात देण्याचा प्रयत्न रवि शिंदे करीत आहेत.
कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान रवि शिंदे यांनी निशुल्क कोविड केअर सेंटर सुरु करुन व एक हात मदतीचा उपक्रम राबवून जिल्ह्यात लोकोपयोगी कार्य केले आहे. दरम्यान सततची धावपळ व व्याप यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांना दाखल व्हावे लागले. मात्र प्रकृती स्वास्थ्य पुर्ववत होताच रवि शिंदे यांनी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गावोगावी जनसेवेचे कार्य सुरु केले आहे. गरीब व गरजुंपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा ध्यास आहे. एक हात मदतीचा हा उपक्रम व ट्रस्टच्या माध्यमातून जमेल ते सहकार्य करत राहू असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Previous articleत्या फ्राय चिकन चोरणाऱ्या पत्रकाराला मिळाली फ्राईड थापड?
Next articleदखलपात्र :- ग्रामपंचायत पदाधिकारी १५ आगस्ट रोजीची ग्रामसभा घेणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here