Home चंद्रपूर दखलपात्र :- ग्रामपंचायत पदाधिकारी १५ आगस्ट रोजीची ग्रामसभा घेणार?

दखलपात्र :- ग्रामपंचायत पदाधिकारी १५ आगस्ट रोजीची ग्रामसभा घेणार?

 

जिल्हा परिषदने या संबंधात काढलेला आदेश कायद्यात बसत आहे का?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

प्रत्येक गावातील ग्रामसभा ही गावांचे हक्काचे व्यासपीठ असते. ती गावातील ‘लोकसभा’ असते. … थोडक्यात सांगावयाचे झाले तर, ग्रामपंचायतीच्या कारभारात गावातील ग्रामस्थांचा सहभाग असेलेले गावातील लोकांचे व्यासपीठ म्हणजेच ग्रामसभा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक 15 ऑगस्ट ला ग्रामसभा घ्यायच्या की कसे याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक 12 ऑगस्ट ला पत्र दिले पण याबाबत कुठलेही विचारमंथन न करता जिल्हा परिषद तर्फे पत्र काढून दिनांक 15 ऑगस्ट ला ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आल्याने जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच व सचिव यांच्यात एकच गोंधळ उडाला आहे.

महाराष्ट्र ग्रा. पं अधिनियम, 1959 चे कलम 7 नुसार पंचायतीने ग्रामसभा आयोजनाबाबत व मुंबई ग्रामपंचायत
बैठकाबाबत नियम 1959 – 2. महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागचे परीपत्रक क्र. व्हीपीएम 2020/प्र.क्र. 312/पंरा- 3, दि. 15.1.2021.अन्वये घेण्याचे आदेश आहेत या नुसार किमान सात दिवसापूर्वी संबंधित ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ यांना नोटीस देण्याचे प्रावधान आहे, मात्र चंद्रपूर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 12.08.2021 ला जिल्ह्यातील ग्रामपंचायतला आदेश दिले की येणाऱ्या 15 ऑगस्ट ला ग्रामसभा आयोजित करा. पण हा आदेश चुकीच्या पद्धतीने असून नियमांनुसार 15 ऑगस्ट ला ग्रामसभा घेण्यात याव्या यापेक्षा ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा घ्या असा आदेश असायला हवा होता कारण त्या दिवशी झेंडावंदन व यांसाठी मोठी तयारी ग्रामसचिव यांना करावी लागते व त्यात सर्वांची धांदल उडत असते.

शासन निर्णयात जर एखाद्या ग्रामपंचायत ला ग्रामसभा आयोजित करायची असेल तर 7 दिवसाच्या आत सर्व पदाधिकारी सदस्य यांना नोटीस देऊन ग्रामपंचायत समोर नोटीस लावायचा असतो पण जर जिल्हा परिषद मधूनच तीन दिवसापूर्वी ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश येत असेल तर मग स्थानिक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सचिव हे कधी नोटीस काढणार? काय दोन दिवसात नोटीस काढून ग्रामसभा होऊ शकते हा प्रश्न सरपंच उपसरपंच व सचिवांसमोर असल्याने आता ही ग्रामसभा 15 ऑगस्ट ला होईल का याबाबत संभ्रम कायम आहे.

Previous articleकोरोनाने मृत झालेल्या गरीब पालकांच्या पाल्यांचा व गरीबांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च ट्रस्ट उचलेल : रवि शिंदे
Next articleदुर्दैवी:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट जागीच ठार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here