Home भद्रावती दुर्दैवी:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट जागीच ठार.

दुर्दैवी:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट जागीच ठार.

 

पाच बिबट समूहाने असल्याची माहिती. वरोरा भद्रावती मार्गावरील घटना.

भद्रावती प्रतिनिधी :-

काल दिनांक १३ ला रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक लागून एका मोठ्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वरोरा भद्रावती मार्गावरील टाकळी गावाजवळ घडली. याबाबत भद्रावती वन विभागाला माहिती देण्यात आली होती पण जवळपास तासभर बिबट घटनास्थळीच पडून होता.

काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी रात्री रात्री साडेआठच्या सुमारास वरोरा भद्रावती मार्गावरील टाकळी गावाजवळ पाच बिबट समूहाने आढळून आलेत. यापैकी एका मोठ्या बिबटने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला असता त्याच मार्गाने भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली ती धडक एवढी जोरदार होती की यात सदर बिकट घटनास्थळीच ठार झाला. त्यानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून प्रसार झाला आहे. उरलेले चार बिबट इतरत्र पळून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. मृत्यू झालेला बिकट रस्त्यावर पडून असल्याचे काही प्रवाशांना आढळून आल्याने काहींनी भद्रावती वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे यांना माहिती दिली. मात्र तासभर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित झालेले नव्हते. वरोरा भद्रावती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. जंगल भागातून वन्य प्राणी रस्ता ओलांडत असतात. भरधाव वाहनामुळे वन्यप्राण्यांना अपघातात जीव गमवावा लागतो त्यामुळे जंगल लगत असलेल्या मार्गावर वन्य प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी वन्यजीवप्रेमवंनी केली आहे.

Previous articleदखलपात्र :- ग्रामपंचायत पदाधिकारी १५ आगस्ट रोजीची ग्रामसभा घेणार?
Next articleअखेर नियतीने मायबाप हिरावलेल्या लेकरांचे मनसेने स्वीकारले दायित्व.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here