Home चंद्रपूर अखेर नियतीने मायबाप हिरावलेल्या लेकरांचे मनसेने स्वीकारले दायित्व.

अखेर नियतीने मायबाप हिरावलेल्या लेकरांचे मनसेने स्वीकारले दायित्व.

 

मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी दिला मुला मुलीना मोठ्या भावासारखा आधार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

अगदी लहान असतानाच मुलगा वैभव वय १५ वर्षे आणि एक मुलगी पौर्णिमा २० वर्षे ह्यांचे आई चे छत्र हरवले आणि त्यानंतर मोलमजुरी करून जगवणाऱ्या वडिलांनी त्यांना सांभाळून लहानाचे मोठे झाले. परंतु प्रदीर्घ आजाराने वडील देखील सोडून गेले आणि वडिलांच्या छत्रछायेत मोठे झालेली पोर पोरकी झाली.

बाळा घागरगुंडे राहणार दाताळा यांचे मागच्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या पछ्यात एक मुलगा वैभव वय १५ वर्षे आणि एक मुलगी पौर्णिमा २० वर्षे ह्या मुलांवर वडिलांच्या जाण्याने आभाळ कोसळल. मोठी मुलगी पदवीच्या पहिल्या वर्षात तर लहान मुलगा दहावीत असल्याने पुढचे शिक्षण कसे करायचे, आणि घरची चूल कशी पेटवायची हा प्रश्न मोठ्या मुलीला पडला. घराशेजारी मुलांचे मोठे वडील काका राहतात ते पण मोलमजुरी करून घर चालवणारे.
ही माहिती गावातील मनसेचे महाराष्ट्र सैनिक करण नायर, मयूर मदनकर, यश घागरगुंडे याना पोरके झालेल्या पोरांची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही हे पाहून हळहळ व्यक्त होत होती ही माहिती त्यांनी मनवीसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांना कळविली, समाजाला आपलं काहीतरी देणं  लागत ह्या विचाराने राहुल बालमवार यांनी दोन्ही मुला मुलींची मोठ्या भावाच्या नात्याने जबाबदारी घेत त्यांना महिन्याला लागणारे धान्य व किराणा तसेच आर्थिक साहाय्य करण्याचे दायित्व स्वीकारले तसेच शिक्षणात येणाऱ्या अडचणी व इतर मदतीसाठी त्यांचा मोठा भाऊ सदैव त्यांच्या पाठीशी राहील अश्या शब्दात त्यांनी मायेच्या आधार ह्या मुलांना दिला. आज शनिवारी त्यांच्या घरी भेट देऊन रोख पाच हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य व त्यांना महिन्याभराचे धान्य व किराणा यावेळी त्यांना देण्यात आला.

Previous articleदुर्दैवी:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट जागीच ठार.
Next articleधक्कादायक :- चंद्रपूरातील “मयूर एजन्सी” कडून ग्राहकाची फसवणूक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here