Home चंद्रपूर तक्रार :- अवैद्य रेती साठा तात्काळ जप्त करून साठवणूक दारांवर गुन्हे दाखल...

तक्रार :- अवैद्य रेती साठा तात्काळ जप्त करून साठवणूक दारांवर गुन्हे दाखल करा.

 

आमदार किशोर जोरगेवार यांचा अवैध रेती साठा भाजप च्या रडारवर.

भाजपचे शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे यांची रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपुर शहरामध्ये रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध साठवणूक केली जात असून अयप्पा मंदिर, कारमेल अकादमी चंद्रपुर च्या मागे खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा रेती साठा केलेला आहे, या संदर्भात भारतीय जनता पक्षातर्फे शनिवार दिनांक ७ ऑगष्ट २०२१ रोजी तक्रार करण्यात आली होती, पण तरीही साठवणूक दारांवर कुठलीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे कारवाई न झाल्याने साठवणूक दाराला वाचवण्याचा काही अधिकाऱ्यांमार्फत प्रयत्न होत आहे, मिळालेल्या माहितीनुसार सदर रेती साठा करणाऱ्यानी छत्तीसगड मधून टीपी आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्यामुळे हा रेती साठा त्वरित जप्त करून साठवणूक करणाऱ्या किशोर जोरगेवार यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजप चे चंद्रपूर शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे यांनी रामनगर पोलीस स्टेशन मधे दिलेल्या तक्रारीत केली आहे.

भाजप आणि किशोर जोरगेवार यांच्यात आंदोलन प्रतिआंदोलन दिनांक ९ ऑगस्ट ला गांधी चौकात झाले होते. आमदार किशोर जोरगेवार यांच्या “चार एक्के दे धक्के.” विरुद्ध भाजपचे २०० युनिट वीज मोफत चे आश्वासन गेले कुठे यासाठी घंटानाद आंदोलन झाले होते.दोन्ही गटावर पोलीस विभागातर्फे गुन्हे दाखल झाले पण हा वाद आता शह प्रतिशह मधे परावर्तित होत असून किशोर जोरगेवर यांच्या मोफत २०० युनिट वीज बीलाचा मुद्दा आता भाजप च्या राडारवर असून जोपर्यंत किशोर जोरगेवार मोफत २०० युनिट वीज बीलाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील असा इशारा आंदोलन दरम्यान देण्यात आला होता.

कधी होईल किशोर जोरगेवार यांच्या रेती साठय़ावर कारवाई?

एकीकडे आमदार किशोर जोरगेवार हे चंद्रपूर महानगर पालिका सत्ताधारी यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर काढण्यासाठी आंदोलन करत आहे तर दुसरीकडे किशोर जोरगेवार स्वता जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता जनतेच्या हिताचे मुद्दे सोडून स्वताच्या हिताचे मुद्दे समोर करीत आहे. एवढेच नव्हे तर तूकूम परिसरात रेतीचे मोठे साठे त्यांनी साठवणूक करून याची टीपी असल्याचे पत्रकारांना सांगितले जाते तर मग किशोर जोरगेवार यांची नैतिकता काय हे जनतेला कळली असल्याने त्यांच्याकडून होणारे आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे व जनतेला मूर्ख बनविण्याचे कटकरस्थान आहे असे चित्र दिसत असताना त्यांच्या रेती साठ्यावर प्रशासन कारवाई करणार कधी? हा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

Previous articleसावधान :- दीपक आसावानी करतो नवनवीन बायकांशी व मुलीशी ओळख आणि करतो प्रेमाचे नाटक?
Next articleइशारा :- स्थानान्तरीत देशी दारू दुकान बंद करण्यासाठी नागरिक आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here