Home वरोरा त्या कंपनी व्यवस्थापनावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा .

त्या कंपनी व्यवस्थापनावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा .

 

मनसेचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

वरोरा प्रतिनिधी :-

 

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे . त्या नुसार परराज्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही नियमावली लावलेली आहे . हे सर्व नियम पायदळी तुडवित जि एम आर कंपनी व्यवस्थापनाने परराज्यांतून कामगार शहरात आणले . हे कृत्य बेकायदेशीर असून संबंधित कंपनी व्यवस्थापनावरआपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत  गुन्हे दाखल करा अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .

या मागणीला घेवून मनसे आक्रमक झाली असून जो पर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा मनसे पदाधिकारी यांनी घेतला आहे .साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार राज्यात अधिसूचना निर्गमित केल्या असताना . अशा पद्धतीने कायद्याचे उल्लंघन करणे म्हणजे हेकेखोरीचा कळस गाठण्याचाच प्रकार आहे . एकीकडे प्रशासन कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड करत असताना दुसरी कडे कंपनी व्यवस्थापन शेकडो कामगारांचा जथ्था कुठलीही कोरोना चाचणी न करता शहरात आणतात . व त्यातील ५ कामगार यांची कोरोना चाचणी सकारात्मक येथे ही बाब वरोरा शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारी आहे .त्यामुळे संबंधित कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावे अन्यथा आम्हाला मनसे स्टाईल समज द्यावी लागेल असा इशारा निवेदना मार्फत प्रशासनाला देण्यात आला आहे . हे निवेदन मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या मार्गदर्शनात मनसे शहर अध्यक्ष राहुल लोणारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले या वेळी
तालुका उपाध्यक्ष, प्रशांत बदकी,हर्षद घोडीले(शहर संघटक)विकी येरने(ता.प्रसिद्धी प्रमुख),आशिषमित्तपल्लीवर, अमोल बोडणे महाराष्ट्र सैनिक ,अभिजित अष्टकार ,तालुकाध्यक्ष मनविसे ,मुज्जमील शेख ,जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना ,कुणाल गौरकार शहर उपाध्यक्ष ,प्रीतम ठाकरे,कल्पक ढोरे तालुका सचिव,श्रीकांत तळवेकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous articleते चिकन फ्रॉय चोर पत्रकार उतरले गुंडगिरीवर,संपादक संजय कन्नावार यांच्यावर गुंडाकरवी प्राणघातक हल्ला.
Next articleसमाजवादी पक्षाचे युवा नेते तनशील पठाण यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here