Home महाराष्ट्र मनसे आक्रमक :- “मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता…”, त्या नराधमाला...

मनसे आक्रमक :- “मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता…”, त्या नराधमाला फासावर लटकवा.

 

‘आणखी किती निर्भया?’ साकीनाका प्रकरणावर मनसेचा संताप.

न्यूज नेटवर्क :-

दिल्लीच्या २१ वर्षीय साबिया सामूहिक बलात्कार व हत्त्या प्रकारानंतर महाराष्ट्राला संपूर्णपणे हादरवून टाकणारी घटना काल(११ सप्टेंबर) घडली.मुंबईतील साकीनाक्या परिसरामध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला गेला होता. त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण हादरून गेला आहे, तसंच राजकारण्यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील संताप व्यक्त केला आहे. इतर राजकीय पक्षांबरोबर मनसेनंही संताप व्यक्त करत ‘आणखी किती निर्भया?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात बलात्काराची प्रकरणे वाढत असल्याने आता आणखी किती निर्भया? असा सवाल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेवर संताप व्यक्त करून त्या नराधमांना फासावर लटकावण्याची मागणी केली आहे. मनसेने संताप यक्त करत शासनाला प्रश्न केला आहे. ‘आणखी किती निर्भया? मुंबईतील साकीनाका येथील पाशवी बलात्काराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आता मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको. नराधमांना फासावर लटकवा’, अशी मागणी मनसेनं केली आहे.

Previous articleदिल्ली येथील साबिया सैफीच्या क्रूर हत्येतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा द्या.
Next articleगोंदिया चंद्रपूर बल्लारशा लोकल ट्रेन गाडी पूर्ववत सुरू करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here