Home वरोरा दिल्ली येथील साबिया सैफीच्या क्रूर हत्येतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन फाशीची...

दिल्ली येथील साबिया सैफीच्या क्रूर हत्येतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा द्या.

 

मराठी मुस्लिम आरक्षण समिती तर्फे श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थितांनी केली आरोपींना फाशी देण्याची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

दिल्ली येथील साबिया शमीम सैफी रा. संगम विहार, ही मुलगी दिल्ली सिव्हील डिफेन्स विभागातील डी. एम. दिल्ली (दक्षिण) कार्यालय येथे नोकरीस होती. अतिशय विभत्स अवस्थेत क्रुरपणे हत्या केलेला तिचा मृतदेह सुरजकुंड, दिल्ली येथे आढळून आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. परंतू सोशल मिडीयावर व न्युजमध्ये प्रसारण झालेल्या माहितीवरुन या क्रुर हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचे दिसुन येते. मयत मुलगी ही फक्त २१ वर्षांची होती व ती नुकतेच चार महिन्यांपुर्वी नोकरीवर हजर झाली होती. मिडीया व न्युज च्या माध्यमातून प्रसारीत झालेली माहिती अशी की, तिचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार केले व तिची क्रुरपणे हत्या केली गेली. मानव जातीला अशोभनीय असा हा गुन्हा अतिशय क्रुरपणाचा कळस गाठणारा आहे. या गुन्ह्याची दिल्ली येथे पोलीस स्टेशन मधे एफ.आय.आर. नोंदविली गेली आहे. परंतु या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त आरोपी असल्याने व उच्च शिक्षित असलेल्या साबीया हिची ज्या पद्धतीने क्रूरपणे हत्त्या करण्यात आली तो तपास करणे आवश्यक असल्याने या गुन्ह्याची चौकशी सी. बी. आय. मार्फत करण्यात यावी व सदर केस ही फाक्टट्रॅक कोर्टात व डे टु डे चालविण्यात येऊन या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी वरोरा येथील मराठी मुस्लिम आरक्षण समिती तर्फे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात मान्यवरांनी केली आहे.

वरोरा येथे घेण्यात आलेल्या साबीया मृतक हिच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते मोरेश्वर टेमुर्डे, आमदार प्रतिभा धानोरकर, मनसेचे नेते रमेश राजूरकर. वरोरा नगरपरिषदचे अध्यक्ष अहेतेशाम अली, बांधकाम सभापती छोटूभाई शेख, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जामील शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूर शहराच्या एका हनुमान मंदिराच्या मागे नग्नावस्थेत आढळले महिला व युवक.
Next articleमनसे आक्रमक :- “मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता…”, त्या नराधमाला फासावर लटकवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here