Home विदर्भ खळबळजनक :- अमरावती जिल्ह्यात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराने उडाली खळबळ.

खळबळजनक :- अमरावती जिल्ह्यात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराने उडाली खळबळ.

२० वर्षीय नराधमांने आपल्या दुचाकीवर बसवून शेतात केला अत्याचार.

न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसांपासून बलात्कारांच्या घटनांनी समाजमन हादरून गेल असून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा ठाकला आहे. काल मुंबईतील साकीनाका तसेच अमरावतीत झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी अगोदरच जनआक्रोश असतांना आज पुन्हा अमरावती जिल्ह्यात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस ठाण्या अंतर्गत अत्याचाराची घटना घडली आहे. पीडित चिमूकली ही आपल्या मैत्रिणी सोबत गावाबाहेर शौचालयाला जात असताना गावातील २० वर्षीय नराधमाने तिला गवत कापायला जाऊ या बहानाने दुचाकीवर बसवून स्वतःच्या शेतात नेलं व तिथं तिच्याशी बळजबरी करून नको त्या ठिकाणी स्पर्श केला. त्यामुळे पीडित आईच्या तक्रारी वरून नराधम युवका विरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.. दरम्यान अमरावतीत दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here