Home भद्रावती महत्वाची बातमी :- माजरीच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक सोमवारी ते मंगळवारला सकाळपर्यंत बंद

महत्वाची बातमी :- माजरीच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक सोमवारी ते मंगळवारला सकाळपर्यंत बंद

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे ठाणेदार विनीत घागे यांचे आवाहन.

माजरी प्रतिनिधी (रवि भोगे)

माजरी–नागपुर ते चंद्रपूर दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी सोमवारी दि. १४ दुपारपासून मंगळवारी सकाळपर्यंत एमरजेंसी कामामुळे माजरी – भांदक या रेल्वे मार्गावर भांदक गेट क्र.३२ वरुन वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वेमार्ग दुरुस्तीसाठी सोमवारी दुपारी तीन ते मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत माजरीच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

प्रवाशांची गैरसोय रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी सकाळी दहानंतर वाहतूक सुरळीत होणार आहे अशी सूचना रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्रवाश्यांनी यावेळेत या मार्गावरुन प्रवास करू नये असे आवाहन माजरीचे ठाणेदार विनित घागे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here