नवऱ्याने पत्नीची केली क्रूर हत्त्या प्रियकर मात्र झाला फरार.
प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी
“प्रेम हे प्रेम असत ज्याचं त्याचं सेम असतं” असं म्हटल्या जातंय ते आता खरं वाटायला लागल असून प्रेमात आंधळे झालेल्या प्रेमविरांचा शेवट काय होतो याची तमा न बाळगता आंधळेपणात आपल्या जीवनाचा ते कधी कधी अंत करून घेत असतात त्याची प्रचिती कोरपना तालुक्यातील थिप्पा या गावातील एका विवाहित महिलेवर ओढवली असून तिचे आपल्या गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते आणि त्या प्रियकरासोबत कामक्रीडा करतांना नवऱ्याने बघितले व तेव्हांच तिच्या अंगावर मोठा दगड टाकून पतीने तिची क्रूरपणे हत्या केली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कोरपना तालुक्यातील थिप्पा हे गाव महाराष्ट्राच्या बॉण्ड्री वर बसलेल आहे. थिप्पा या गावी संगीता या एका महिलेचे लग्न तेरा वर्षा पूर्वी अय्या कोडापे यांच्याशी झाल .मात्र त्यांचा मृत्यू झाला. नंतर संगीता अय्या कोडापे वय 32 वर्ष या महिलेने गणेश मडावी वय 40 वर्ष, राहणार जामडोह याच्याशी 2020 रोजी दुसरा विवाह झाला. दरम्यान संगीताचे गावातील एका यूवकासोबत प्रेम जडलं व दोघांचे शारीरिक सबंध नेहमीच व्हायचे.ही बाब दुसऱ्या पतीला (गणेश मडावी) माहिती झाली. तेव्हापासून तो दररोज दारू प्यायला लागला अशातच दिनांक 30/9/2021 ला पत्नी संगीता ही आपल्या प्रियकरासोबत शय्येवर कामक्रीडा करतांना त्याने रंगेहाथ पकडले व त्याचा दिमाग खराब होऊन त्याने रागाच्या भरात एक मोठा दगड उचलून पत्नी संगीता च्या डोक्यावर टाकला व तिथून पळ काढला. त्या दरम्यान प्रियकर पण पळाला मात्र अकस्मात झालेल्या या घटनेने महिलेचे वडील भाऊ धावून आले पण त्यांना आरोपी दिसला नाही पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संगीताला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले पण सात दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर दिनांक 7/9/2021 ला ती मरण पावली.
या संदर्भात कोरपणा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात येऊन आरोपी गणेश मडावी याला त्याच्या मूळ गाव असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील जामडोह येथून अटक करण्यात आली पण त्या महिलेच्या पहिल्या पतीची मुलगी कल्पना वय 8 वर्ष व मुलगा 5 वर्ष हे मात्र पोरके झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या आरोपीला अटक करण्याकरता पोलीस कर्मचारी जाधव ,संजय शुक्ला, रामा पुष्प पोळ यांनी कामगिरी बजावली.या घटनेचा संपूर्ण तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे व कोरपना पोलिसांनी केला.