Home चंद्रपूर अतिशय दुःखद :- उप्परवाही येथील शेतकरी किसन मटाले यांच्या पवन नावाच्या मुलाचा...

अतिशय दुःखद :- उप्परवाही येथील शेतकरी किसन मटाले यांच्या पवन नावाच्या मुलाचा बुडून मृत्यु.

 

बैलबंडी सुलार होऊन खोल पाण्यात बुडल्याने बाप पोहून थडिला तर मुलाचा दुर्दैवी मृत्यु.

चंद्रपूर न्यूज वार्ता :-

उप्परवाही येथील शेतकरी किसन मटाले हे पवन नावाच्या मुलासह शेतात फवारणी करिता बैलबंडी घेऊन गेले होते. बैलबंडीवर 200 लिटरचा ड्रम होता तो भरण्यासाठी जवळच्या नाल्यावर ते गेले होते दरम्यान बैलबंडीचा तोल जावून ती बंडी पाण्यात खोल बुडाली त्यात पवन नावाच्या मुलाचा बुडून मृत्यु झाला तर त्याचे वडील किसन मटाले हे पोहून थडिला सुखरूप पोहचले. पण आपल्या डोळ्यादेखत आपला मुलगा पाण्यात खोल बुडाला असल्याने त्यांनी टाहो फोडला त्यांच्या आवाजाने काही लोक तिथे पोहचले पण फार उशीर झाल्याने मुलाला ते वाचवू शकले नाही.

शेतकरी किसन मटाले व त्याचे पुत्र पवन हे आज सकाळी 10 वाजता शेतात फवारणी साठी बैलगाडी वर ड्रम घेऊन नाल्यावर पाणी भरण्यासाठी गेले असता बैलगाडी सुलार होऊन खोल पाण्यात बुडाली त्यात पवन चा मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here